Vastu Shashtra Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Shashtra: नवरा-बायकोच्या नात्यातले तणाव टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात दिल्या खास टिप्स

तणाव टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याचे सोपे उपाय वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Sweet Relationship Husband-Wife: वास्तुशास्त्रामध्ये सर्वच गोष्टींबद्दल अत्यंत काळजीपूर्वक माहिती देण्यात आली आहे. जसे की घर घेताना काय काळजी घ्यावी, देवघर कोणत्या दिशेला असावे, घराच्या जिन्याखाली कोणत्या वस्तु ठेउ नये इत्यादी.

पण आज आम्ही तुम्हाला आपण नवरा बायकोमधील नात्याबद्दल सांगणार आहोत. लग्न झाल्यावर त्या दोघांमध्ये गोड संबंध असतात.पण काही कारणास्तव तो गोडवा रागाची जागा घेतो, मग त्या दोघांमध्ये तणाव पाहायला मिळतो. हे तणाव टाळण्यासाठी काय केलो पाहिजे याचे सोपे उपाय वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत.

  • वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय

घर हवेशीर ठेवा

घर (Home) मोकळे आणि हवेशीर असणे खूप महत्वाचे आहे. आरोग्यासह (Health) नातेसंबंधातील सामर्थ्य संवाद देखील वाढवते. याशिवाय विवाहित जोडप्यांच्या पलंगाच्या समोर चुकूनही आरसा नसावा हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. असे मानले जाते की तुमच्या बेडरूममध्ये मोठ्या आकाराचा आरसा लावल्याने नात्यात तणाव येऊ शकतो.

couple
  • बेडरुममध्ये दोघांचा फोटो लावावा

नात्यात गोडवा आणण्यासाठी तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबतचा फोटो तुमच्या बेडरूमच्या पश्चिम दिशेला लावू शकता. याशिवाय तुमच्या बेडवर पेस्टल शीटची फ्लोरल डिझाईन असलेली बेडशीट वापरणे देखील शुभ मानले आहे.

  • भिंतींवर भडक रंग नको

घराच्या भिंतींवर भडक रंगांचा वापर टाळावा. तसेच बेडरूमच्या भिंती हलक्या आणि पेस्टल रंगांनी रंगवणेही योग्य आहे. नात्यामधील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी रुमची सजावटही खूप महत्त्वाची असते. रुमच्या सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू नेहमी जोडीने ठेवावे.

Bedroom
  • घरचं बेडरुम कोणत्या दिशेला असावं

बेडरूमची योग्य दिशा देखील नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवायचे असतील तर तुमच्या घराची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला बनवा. याशिवाय घराच्या उत्तर-पूर्व दिशेला निळा आणि जांभळा रंग लावणे योग्य राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT