Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: बाल्कनीत रोपं लावतांना कोणती काळजी घ्यावी, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

जर तुम्ही बाल्कनीमध्ये रोपं ठेवत असाल तर तुम्ही वास्तूचे काही नियम लक्षात ठेवा.

Puja Bonkile

Vastu Tips: आजकाल अनेक लोक आपले घर सजवण्यासाठी विविध प्रकारचे रोपं लावतात. झाडं तुमच्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करतात आणि तुमचा मूडही सुधारतात. साधारणपणे आपल्या घराच्या जागेनुसार झाडे ठेवायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. पण घरात अशी एक जागा नक्कीच आहे जिथे प्रत्येकजण एक रोप ठेवतो आणि ती म्हणजे बाल्कनी. तुम्हीही बील्कनीत रोप ठेवत असाल तर वास्तु संबंधित काही नियम पाळणे गरजेचे आहे.

  • योग्य दिशा

जर तुमची बाल्कनी पूर्व दिशेला असेल तर तुळशीचे रोप अवश्य ठेवावे. याशिवाय झेंडूच्या फुलांच्या रोपासारखी काही फुलांची रोपं तिथे ठेवू शकता. खास करून झेंडूचे रोप ईशान्य दिशेला ठेवल्याने मुलांच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होतो.

  • मनी प्लांट

जर तुमची बाल्कनी उत्तर दिशेला असेल तर तिथे कधीही मोठी झाडे लावू नका. या दिशेच्या बाल्कनीसाठी लहान झाडे सर्वोत्तम मानली जातात. या दिशेला मनी प्लांट ठेवणे चांगले मानले जाते. याशिवाय तुम्ही येथे क्रॅसुलाचे रोपं देखील ठेवू शकता.

  • बाल्कनी पश्चिम दिशेला असल्यास

जर तुमची बाल्कनी पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही येथे मध्यम आकाराची हिरवी झाडे ठेवू शकता. या रोपांची उंची 2 फूट ते 4 फूट दरम्यान असावी हे लक्षात ठेवा. या दिशेच्या बाल्कनीत लहान रोपे ठेवल्याने काही फायदा होणार नाही. जर तुम्ही येथे काही मोठी झाडे ठेवली तर त्यामुळे तुमचा शनि मजबूत होतो.

  • बाल्कनी दक्षिण दिशेला असल्यास

जर तुमच्या बाल्कनीची दिशा दक्षिण असेल तर तुम्ही येथे मोठी आणि जड झाडे ठेऊ शकता. येथे तुम्ही ब्लॅक फिकस किंवा पाम रोपे ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही येथे मधुमालती किंवा बोगनविले इत्यादी काही वेली टांगू शकता. यामुळे बाल्कनी छान दिसेल आणि तुमचा मानही वाढेल.

  • अशी झाडे ठेवू नका

जेव्हा तुम्ही बाल्कनीमध्ये रोपं लावता तेव्हा काही झाडे टाळावीत. उदाहरणार्थ, तुमची बाल्कनी कुठल्या दिशेला असली तरीही तुम्ही बाल्कनीमध्ये कॅक्टस किंवा रबराचे रोप लावू नये. वास्तुनुसार बाल्कनीतील एखादे रोप सुकले तर तेथून लगेच काढून टाकावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT