Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Shatra Tips: 'या' दिशेला पितरांचे फोटो चुकूनही ठेऊ नये, वाढू शकतो पितृदोष

वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही घरात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकता.

Puja Bonkile

Vastu Tips For Pitru Paksh: पितृपक्ष 29 सप्टेंबरला सुरू झाला असून 14 ऑक्टोबर 2023 ला संपणार आहे.  या काळात पितरांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी आणि तर्पण केले जातात. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

पितर प्रसन्न असल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. त्याचबरोबर पितरांना राग आल्यास पितृदोष सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पितृ पक्षाशी संबंधित विशेष नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे मानले जाते. वास्तूमध्ये पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावे याबाबत जाणून घेऊया.

देवांच्या फोटोसोबत

आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण अनेकदा त्यांचे फोटो घरात लावतो. त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहावा म्हणून अनेक लोक देवी-देवतांच्या फोटोसोबत घरातील वडीलधाऱ्यांचो फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. देवाच्या फोटोसोबत पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये.

बेडरूम

वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये, पायऱ्या आणि स्वयंपाकघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. असे मानले जाते की यामुळे घरात समस्या निर्माण होतात. घराच्या मध्यभागी पूर्वजांचे फोटो लावल्याने मान-सन्मानाला कमी होऊ शकतो. यामुळे पितृदोषाला सामोरे जावे लागू शकते.

डोळ्यांसमोर

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो अशा ठिकाणी कधीही लावू नये, जिथे तुमची नजर पुन्हा पुन्हा पडेल. असे मानले जाते की यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.

देवघर

वास्तुशास्त्रानुसार देवघरात पूर्वजांची फोटो लावू नयेत. कराण असे केल्यास घरातील सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागु शकतो.

फॅमिली फोटो

फॅमिली फोटोंसोबत पूर्वजांचे फोटो कधीही लावू नयेत. वास्तूनुसार घरामध्ये जिवंत लोकांसोबत पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की ज्या जिवंत व्यक्तीच्या पूर्वजांचे फोटो लावलेले असतात त्यांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

या दिशाला लावू नका

पूर्वजांचे फोटो उत्तर आणि पूर्व दिशेला लावू नयेत. ही देवाची दिशा मानली जाते. पूर्वजांचे फोटो या दिशेला लावल्याने देवी-देवता कोपतात.

योग्य दिशा

घराच्या दक्षिण दिशेला पितरांची फोटो नेहमी लावणे शुभ मानले जाते. ही दिशा यमराजासह पितरांची दिशा मानली जाते. घराच्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावू शकता.

पुजा करतांना घ्यावी काळजी

वास्तुशास्त्रानुसार पितरांचे फोटो लावण्यासोबतच हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांची पूजा नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT