Vastu Tips For Holi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Holi: होळीपूर्वी 'या' वस्तु घराबाहेर काढा, नाहीतर माता लक्ष्मी होईल नाराज

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तू दोष आहे तर होळीपुर्वी हे काम पहिले करा.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Holi: हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी होळीचा सण 08 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. आतापर्यंत तुम्ही दिवाळीच्या स्वच्छतेबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की दिवाळीप्रमाणेच होळीमध्येही घराची साफसफाई केली जाते. 

जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर होळीच्या आधी घरात पडलेल्या काही निरुपयोगी वस्तू घरा बाहेर काढल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात देवी लक्ष्मी वास करते. 

  • तुटलेला आरसा किंवा बंद घड्याळ
    जर तुमच्या घरात तुटलेला आरसा किंवा बंद घड्याळ असेल तर होळीपुर्वी काढून टाका. कारण तुटलेला आरसा आणि बंद घड्याळ हे दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते.

  • तुटलेली मूर्ती
    जर तुमच्या घरात तुटलेली मूर्ती पडली असेल तर ती ताबडतोब घराबाहेर काढावी. ही मूर्ती पवित्र तलाव, विहीर किंवा नदीच्या वाहत्या पाण्यात वाहावी. अन्यथा घरामध्ये (Home) वास्तुदोष निर्माण होतील आणि तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. 

  • फाटलेले जुने शूज आणि कपडे
    तुमच्या घरात फाटलेले जुने जोडे आणि चप्पल, जे वापरात नाहीत, तर ते ताबडतोब घराबाहेर फेकून द्या. कारण या गोष्टी राहू-केतूचे कारक आहेत. जे त्यांचे नकारात्मक परिणाम दर्शवतात.

  • खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू
    जर तुमच्या घरात जुन्या खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या असतील, ज्याचा वापर होत नसेल तर त्यांना घराबाहेर काढा. कारण अशा गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

  • घराची साफसफाई
    जर तुमच्या घरात अशा काही गोष्टी असतील, ज्यामुळे तुमचे घर अस्वच्छ किंवा रद्दीसारखे दिसत असेल तर अशा वस्तू घरातून काढून टाका. अन्यथा घरामध्ये नकारात्मक परिणाम दिसतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT