Vastu Tips For Family Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Family: 'हे' उपाय केल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य राहिल निरोगी

कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही या वास्तु टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Vastu Tips For Family: वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यास तुम्हाला कधीही आर्थिक किंवा आरोग्या संबंधित समस्या निर्माण होणार नाही. आरोग्य चांगले असेल तर आपण काम करू शकतो. पण कधी कधी घरातील वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्य सारखे आजारी पडतात. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले आणि घरात आनंदाचे वातावरण राहु शकते.

  • प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार तुटलेला असेल किंवा त्यात काही दोष असेल तर लगेच दुरुस्त करावे. वास्तूनुसार तुटलेला दरवाजा असणे अशुभ मानले जाते. याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि घरात वाद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घराचे प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीट असावे.

  • फर्निचर ठेवण्याची योग्य जागा

घरातील जड वस्तु जसे की फर्निचर आणि इतर वस्तु घराच्या मध्यभागी ठेऊ नका. वास्तुनुसार हे स्थान ब्रम्ह स्थान मानले जाते. यामुळे ही जागा नेहमी मोकळी ठेवावी. या ठिकाणी जड वस्तु ठेवणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • मंदिराचे योग्य स्थान

वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान कोपरा अत्यंत शुभ मानला जातो. कारण ते देवाचे निवासस्थान मानले जाते. जर तुमच्या घराचे मंदिर या दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते. या दिशेला मंदिर असल्‍याने तुम्‍हाला निरोगी आरोग्य तर मिळेलच शिवाय घरात सुख-समृद्धीही येईल. मंदिर योग्य दिशेला असेल तर देवाची कृपा कायम राहते.

  • 'या' वस्तु घरातून बाहेर काढा

घरामध्ये कधीही तुटलेला आरसा, बंद घड्याळ, रद्दी यासारख्या वस्तु ठेऊ नका. कारण याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तसेच आर्थिक समस्याही निर्माण होऊ शकतात. तसेच उपयोगात येत नसलेली वस्तु घरात वस्तू ठेवू नका. संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळावा, यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि शरीर देखील निरोगी राहते.

  • 'ही' वस्तु घरात ठेवावी

वास्तुशास्त्रानुसार घर किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल ट्री ठेवणे शुभ मानले जाते. क्रिस्टल ट्री नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण तयार करते. तसेच कधीही आर्थिक समस्या जानवत नाही.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT