Vastu Tips For Sofa
Vastu Tips For Sofa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Sofa: घरात योग्य दिशेने सोफा ठेवल्यास नांदेल सुख-शांती

दैनिक गोमन्तक

आपल्या घरात सोफा योग्य ठिकाणी ठेवणे खूप महत्वाचे आहे. तसेच सोफ्याची देखभाल आणि स्थिती याबाबत वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपल्या ड्रॉईंग रूममधलं सगळ्यात महत्त्वाचं फर्निचर म्हणजे सोफा. त्याच्या देखभालीमध्ये आपण काही चूक केली तर आपल्याला खूप नुकसान सहन करावे लागू शकते. सोफा ठेवताना झालेल्या चुका घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करतात. वास्तुशास्त्रामध्ये सोफा कोणत्या दिशेने ठेवावे याबाबत सांगितले आहे.

एल आकाराचा सोफा ठेवताना लक्षात ठेवा

आजच्या काळात घरांमध्ये L आणि U आकाराचे सोफे ठेवण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अशा सोफ्यांसाठी दिशा आणि स्थान अत्यंत काळजीपूर्वक निवडले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या घरात एल आकाराचा सोफा ठेवत असेल तर तो अशा प्रकारे ठेवा की त्याचा एक भाग ड्रॉईंग रूमच्या दक्षिण दिशेला असेल आणि दुसरा भाग पश्चिम दिशेला असेल. याचा अर्थ सोफ्यावर बसताना व्यक्तीने उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे लागेल.

दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या घरात U आकाराचा सोफा ठेवत असेल तर लक्षात ठेवा की त्याचा सर्वात मोठा भाग ड्रॉईंग रूमच्या दक्षिण दिशेला असावा आणि उर्वरित दोन भाग पश्चिम आणि उत्तर दिशेला असावा.

* सोफ्याच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा

सोफाचा वरचा भाग तसेच त्याच्या खालचा भाग स्वच्छ करावा.

सोफा अशा प्रकारे ठेवावा की सोफ्यावर बसताना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात कोणताही अडथळा येणार नाही किंवा त्यातून कोणताही आवाज येणार नाही.

कपडे किंवा इतर वस्तू कधीही सोफ्यावर ठेवू नका.

सोफा नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

SCROLL FOR NEXT