Turti Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तुदोष दूर करण्यासाठी अशी वापरा 'तुरटी'

Vastu Tips: तुरटीच्या वापराने आर्थिंक कुचंबणाही होईल दूर

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रात फक्त दिशा आणि त्यांचे महत्त्वच उपयोगाचे नसते तर, तर घरतल्या लहान-लहान वस्तूंच्या साहाय्याने आपण दोषांचे निवारण करू शकतो. घरातील दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या काही वस्तूंच्या मदतीने आपल्या घरातील वास्तूदोष दूर केले जाऊ शकतात. तुरटीच्या सहाय्याने वास्तूदोष दूर कसे करता येतील जाणून घ्या.

तुटरीमुळे घरातील आर्थिंक कुचंबणा होईल कमी

ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ सांगतात की, वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर वास्तू दोष तर दूर होतात त्याचबरोबर आर्थिक समस्यांचे देखील निराकरण होते. तुरटी अगदी सहजपणे उपलब्ध होते. तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अगदी ५ ते १० रुपयांमध्ये येणाऱ्या तुटरीमुळे अनेक समस्या दूर होतात.

घरात कुठे ठेवावी तुरटी?

वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की, घराच्या दारा-खिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही खिडकीत किंवा दरवाज्यांच्या वरती ठेवा. असे मानले जाते कि, घराजवळ जुनाट पडकी घरं किंवा एखाद्या घराचा ढिगारा पडलेला असेल, तर त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर आणि खिडक्यांवर तुरटी ठेवाल तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या घराजवळ एखादं स्मशान किंवा कब्रस्तान असेल तर तुम्ही हा तुरटीचा प्रयोग नक्की करा. तुरटी काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असल्याचे म्हटले जाते. ही तुरटी एका महिन्यानंतर बदलत राहा.

​बाथरुममध्येही ठेवा तुरटी

बाथरुममध्ये जे दूषित पदार्थ असतात, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघते. बाथरुममध्ये तुरटी ठेवल्यास या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.घराच्या बाथरुममध्ये देखील एका वाटीत तुरटी ठेवा आणि तिलाही दर महिन्याला बदला.

तुटरीमुळे ​आर्थिक चणचण होईल दूर

तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि ते सहा निळ्या फुलांसही एका नव्या काळ्या किंवा लाल कापडात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा. यामुळे रस्त्यातल्या प्रेतबाधेपासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कायम पैशांनी भरलेला राहील. तुरटी खायच्या पानात बांधून खिशात ठेवणंही चांगलं असं म्हटलं जातं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT