Vastu Tips: वास्तुशास्त्रात वास्तुदोषाबाबत अनेक समस्यांसाठी उपाय सांगतिलेले आहे. वास्तुत सांगितलेले उपाय केल्यास तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. जर तुम्हाला ऑफिसमध्ये खुप मेहनत घेऊनही फळ नसेल मिळत तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.कधी कधी छोट्या गोष्टींमुळे देखील आपल्या कामावर विपरित परिणाम होऊ शकतो. वास्तुनुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या टेबलवर ठेऊ नये. कारण त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
निरुपयोगी वस्तु
अनेक वेळा आपण टेबलावर अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यांचा आपल्या कामाशी काहीही संबंध नसतो. तुम्हाला कामात न येणाऱ्या फाईल्स किंवा कागदपत्रे टेबलावर ठेऊ नका. यामुळे आपले कामात लक्ष लागत नाही. त्याच वेळी त्याच्या कामात वारंवार चुका होण्याची शक्यता असते.
असे फोटो ठेऊ नका
अनेकवळा टेबल सजवताना लोक त्यावर फोटोही ठेवतात. परंतु जुन्या आठवणींना उजाळा देणारे असे कोणतेही फोटो ठेवू नका. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जी आता या जगात नाही किंवा ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम केले, पण आता तो तुमच्यापासून दूर आहे. अनेक वेळा असे फोटो पाहून खूप वाईट वाटते. हे तुमच्या कामासाठी चांगले नाही. नेहमी लक्षात ठेवा की कामाच्या वेळेत फक्त कामच केले पाहिजे.
खराब वस्तु
काहीवेळा काही स्टेशनरी जसे की पेन इत्यादी खराब होतात किंवा संगणकाचा काही भाग इत्यादी व्यवस्थित काम करत नाहीत. अशा वस्तु टेबलवर ठेऊ नका. ते लगेच दुरूस्त करा. अशा वस्तुंमुळे नकारात्मकता येते.
आरसा ठेवणे टाळा
टेबलवर कधीही आरसा ठेवू नका. टेबलवर ठेवलेला आरसा नकारात्मकता निर्माण करतो. नकारात्मक भावनांमुळे मनात कामाबद्दल इंटरेस्ट राहत नाही. यामुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो.
टेबलक्लॉथ
काही लोक त्यांच्या टेबलवर टेबलक्लॉथ ठेवतात. त्यामुळे टेबल अधिक चांगला दिसतो. पण टेबलक्लॉथ फाटलेला किंवा अस्वच्छ असेल तर लगेच काढून टाकावा. वास्तुनुसार टेबलक्लॉथ ठेवायचा असेल तर तो स्वच्छ ठेवावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.