Valentine's Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Day: 'व्हॅलेंटाइन डे' ला डेट नाइटा जाताय? मग 'हे' Face Mask नक्की लावा

'व्हॅलेंटाईन डे' ला डेटवर जाण्यापूर्वी चेहऱ्यावर पुढील नॅचरल फेस मास्क लावू शकता.

Puja Bonkile

Valentine's Day fair glowing skin valentine date night party face mask scrub

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे पण खास दिवस 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. जर तुम्हाला या दिवशी सुंदर दिसायचे असेल तर 3 गोष्टी नक्की करा. पहिले म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य, दुसरे म्हणजे चमकणारी त्वचा आणि तिसरा सर्वोत्तम ड्रेस. स्माईल आणि ड्रेस सहज मिळतील पण ग्लोइंग स्किनसाठी काहीतरी खास करावे लागेल.

यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही. तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घरीच घेऊ शकता. व्हॅलेंटाइन स्पेशल डेटिंगपूर्वी पुढील खास पॅक लावू शकता.

गुलाब आणि चंदन

चंदन आणि गुलाबाचे फेस पॅक चेहऱ्यासाठी खुप फायदेशीर आहे. या पॅकमुळे त्वचेवर साचलेली सर्व घाण निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल. यासाठी सर्वात पहिले सुक्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यात चंदन पावडर घाला. त्या मिश्रणात दोन चमचे दही घालून मातीची पेस्ट बनवा. ते त्वचेवर लावून अर्ध्या तासाने पाण्याने धुतल्याने त्वचा चमकदार होते.

चंदन आणि बदाम

चंदन आणि बदाममुळे त्वचा मुलायाम होते. बदाममध्ये असलेले गुण त्वचेला पोषक तत्व देखील मिळतील. बदाम पावडर 2 चमचे चंदनात मिक्स करा. मध आणि दूध थोडे-थोडे मिक्स करा. 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवावे. त्वचा मऊ आणि कोमल होईल.

केशर आणि दूध पॅक

केशरमध्ये अनेक गुणधर्म असतात. त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. त्वचेवर लावल्याने सर्व टॅन डाग दूर होतील. हे पॅक बनवण्यासाठी केशर काही तास दुधात भिजवत ठेवावे. नंतर बेसनामध्ये केशर आणि केशर भिजवलेले दूध मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

कडुलिंब-तुळश

कडुलिंब-तुळशीमुळे चेहऱ्यावरचे मुरुम आणि डाग दूर होतील. तेलकट त्वचेवरचे मुरुम कमी करण्यासाठी हा पॅक लावू शकता. सर्वात पहिले कडुनिंब तुळशीची पाने बारीक करा. त्यात मुलतानी माती मिक्स करा. 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT