Stomach Ulcer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stomach Ulcer: पोटदुखीकडे दुर्लक्ष नको! पोटात अल्सर कशामुळे होतात? 'ही' गंभीर लक्षणे वेळीच ओळखा

Stomach Ulcer Symptoms: अल्सरमुळे केवळ अस्वस्थता निर्माण होत नाही, तर वेळेवर उपचार न केल्यास रक्तस्त्राव किंवा गंभीर संसर्ग यांसारख्या धोकादायक समस्या उद्भवू शकतात.

Manish Jadhav

Ulcer Disease: अल्सर ही एक अशी स्थिती आहे, ज्यात पोट किंवा आतड्यांच्या आतील अस्तरावर (Inner lining) जखमा होतात. हा त्रास बहुतेकदा पोटात (गॅस्ट्रिक अल्सर) किंवा लहान आतड्यांमध्ये (ड्युओडेनल अल्सर) होतो. अल्सरमुळे केवळ अस्वस्थता निर्माण होत नाही, तर वेळेवर उपचार न केल्यास रक्तस्त्राव किंवा गंभीर संसर्ग यांसारख्या धोकादायक समस्या उद्भवू शकतात.

अल्सरची प्रमुख कारणे

अल्सर बहुतेकदा तेव्हा होतो, जेव्हा पोटात किंवा आतड्यांमध्ये ऍसिडचे प्रमाण खूप वाढते किंवा त्यांच्या आतील संरक्षणात्मक थर (Lining) कमजोर होतो. ऍसिड आणि पोटाच्या अस्तरामध्ये संतुलन बिघडल्यास लहान जखमा हळूहळू मोठ्या व्रणांमध्ये बदलतात.

हेलिकोबॅक्टर पायलोरी (Helicobacter pylori) बॅक्टेरिया: अल्सरचे हे सर्वात सामान्य कारण आहे. या बॅक्टेरियाचा संसर्ग पोटाच्या अस्तराला नुकसान पोहोचवतो.

पेन किलर औषधे: डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याशिवाय किंवा दीर्घकाळपर्यंत वेदनाशामक औषधे (NSAIDs) वापरणे.

जीवनशैली: जास्त ताण, धूम्रपान, मद्यपान, अनियमित आणि अस्वस्थ भोजन.

आनुवंशिकता: काही लोकांमध्ये आनुवंशिक (Genetic) कारणांमुळेही अल्सरचा धोका वाढतो.

लक्षणे आणि तज्ज्ञांचे मत

दिल्लीतील वरिष्ठ फिजिशियन डॉ. कमलजीत सिंह कैंथ यांच्या मते, अल्सरची सुरुवात अनेकदा हलक्या लक्षणांनी होते.

सुरुवातीची सामान्य लक्षणे

पोटात जळजळ

जेवणानंतर जडपणा किंवा वेदना

भूक कमी लागणे

उलटी किंवा मळमळ (Nausea) होणे

जेवणानंतर गॅस किंवा ऍसिड रिफ्लक्सचा (Acid Reflux) अनुभव येणे

गंभीर लक्षणे

काळ्या रंगाची विष्ठा (Black Stool) होणे किंवा विष्ठेतून रक्त येणे.

सतत उलटी होणे आणि वजन कमी होणे.

अचानक अशक्तपणा येणे.

जर ही गंभीर लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणे अनिवार्य आहे, कारण दुर्लक्ष केल्यास अल्सरमुळे पोटात किंवा आतड्यांमध्ये छिद्र, अंतर्गत रक्तस्त्राव किंवा गंभीर संसर्ग होऊ शकतो.

अल्सरपासून बचाव कसा करावा?

अल्सर आणि त्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी जीवनशैलीत (Lifestyle) बदल करणे आवश्यक आहे.

जास्त मसालेदार आणि तेलकट भोजन कमी करा.

मद्यपान, धूम्रपान आणि अतिरिक्त कॅफिनचे सेवन टाळा.

पेन किलर औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा.

तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा नियमितपणे चालणे (Walk) सुरु करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT