Bottle Guard Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bottle Guard: दुधी भोपळ्याच्या सालीपासुन बनवलेल्या या टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

Recipe: आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या सालीपासून बनवता येणाऱ्या दोन पाककृती सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

हिरव्या भाज्यांचे फायदे सर्वांना माहीत आहेत. दुधी भोपळा ज्याला सामान्यतः भोपळा म्हणतात. ही एक भाजी आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्यदायी (Healthy) फायदे आहेत. पांढरा-फुलांचा भोपळा, कॅलबॅश, न्यू गिनी बीन, तस्मानिया बीन आणि लांब खरबूज अशा वेगवेगळ्या नावांनी हा भोपळा (Bottle Guard) ओळखला जातो. ही भाजी केवळ शरीराला थंडावा देण्यापुरतीच मर्यादित नाही तर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. झोपेचे विकार कमी करण्यासही मदत करते.

आपण भोपळ्याची भाजी तर बऱ्याचदा खाल्ली असेल. मात्र भोपळ्याची भाजी करताना आपण त्याची साल काढून टाकतो. दिलेल्या माहितीनुसार, भोपळ्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या सालीपासून बनवता येणाऱ्या दोन पाककृती सांगणार आहोत.

भोपळ्याच्या सालीपासून बनवा चवदार भाजी

* लागणारे साहित्य

भोपळ्याची बारीक केली साल-2 कप

अर्धा चमचा जिरे

1 टोमॅटो

1 कांदा

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

हळद

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2

तेल

आलं लसणाची पेस्ट

* कृती

भोपळ्याच्या सालीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढई किंवा पॅनमध्ये तेल घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, कांदा आलं लसणाची पेस्ट टाकून ते चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, मीठ आणि टमाटे टाका. हे मिश्रण थोडे शिजू द्या आणि त्यानंतर त्यामध्ये भोपळ्याच्या साली टाका. यानंतर ही भाजी थोडा वेळ शिजू द्या आणि नंतर कोथिंबीर टाकून गार्निश करा. तुम्ही ही भाजी चपाती किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता.

* भोपळ्याच्या सालीची चटणी

* लागणारे साहित्य

भोपळ्याच्या सालीची चटणी सोपी आणि चवीला खूप स्वादिष्ट असते. यासाठी तुम्हाला एक कप भोपळ्याची साल, अर्धा कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, काळं मीठ, लिंबाचा रस, आणि लसूण लागेल.

* कृती

भोपळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी एक कप भोपळ्याची साल, अर्धा कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, काळं मीठ, आणि लसूण घ्या यावर लोम्बाचा रस पिला आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काही मिनीटांत तुमची भोपळ्याच्या सालीची चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही भजी किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT