Tri Color Dhokla Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tri Color Dhokla: सहजसोपी रेसिपी अन् जिभेवर रेंगाळती चव! स्वातंत्र्यदिन साजरा करा तिरंगा ढोकळ्यासोबत...

स्वातंत्र्यदिनी तिरंगा ढोकळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Puja Bonkile

Tri Color Dhokla Recipe For Independence Day: दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

तर अनेक लोकांना सुट्टी असते. हा खास बनवण्यासाठी तुम्ही घरीच तिरंगा ढोकळा बनवू शकता. ही रेसिपी बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया तिरंगा ढोकळा कसा बनवायचा.

  • तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

3 कप ढोकळा पीठ

1/4 कप पालक प्युरी

2 हिरव्या मिरच्या

1 आल्याचा तुकडा

1 टेबलस्पून गाजर प्युरी

1/4 चमचा काश्मिरी लाल तिखट

1 टीस्पून तेल

2 टीस्पून नारळ पावडर

1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

Tri Color Dhokla

कृती

तिरंगा ढोकळा बनवण्याची सर्वात पहिले ढोकळ्याचे पीठ तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवावे. त्यांना तीन समान भागांमध्ये वेगळे ठेवावे.

  • केशरी ढोकळा

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात पहिले केशर ढोकळ्याचा थर तयार करावा लागेल. यासाठी गाजर प्युरी आणि काश्मिरी लाल मिरची पिठात घालून मिक्स करावे.

पीठ तयार झाल्यावर तेल लावून ढोकळा बनवण्यासाठी प्लेटमध्ये ठेवावे. आता हे पिठ तयार होण्यासाठी गॅसवर ठेवावे. शिजल्यावर ते बाहेर काढून वेगळे ठेवावे.

  • पांढरा ढोकळा

पांढरा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला साधे पीठ ढोकळा साच्यात ओतून गॅसवर ठेवावे लागेल.ते शिजल्यावर ते बाहेर काढून वेगळे ठेवावे.

  • हिरवा ढोकळा

तिरंगा ढोकळ्याचा शेवटचा थर बनवण्यासाठी एका भांड्यात पालक प्युरी आणि आले मिरचीची पेस्ट टाका आणि चांगले मिक्स करावे. आता ते ढोकळा साच्यात घालून शिजवून घ्यावे. शिजल्यावर बाहेर काढून बाजूला ठेवा.

नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी,कढीपत्ता आणि पांढरे तिळ टाकून तडका तयार करून घ्यावा. यानंतर एका प्लेटमध्ये तळाशी केशरी ढोकळा, त्यानंतर पांढरा आणि शेवटी हिरवा ढोकळा ठेवावा.

आता तयार केलेला तडका ढोकळ्यावर टाकावा. वरून कोथिंबीर टाकून सजवून चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT