Travel Tips: प्रवासात मांसाहार करणे टाळावे  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: प्रवासात मांसाहार करणे टाळावे

प्रवास करताना खाण्या- पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

प्रवास कारायला सर्वांनाच आवडते. पण प्रवासात अनेकांना मसालेदर आणि तेलकट पदार्थच खाणे आवडते. तुम्हाला माहिती आहे का असे पदार्थ खाल्यास तुम्हाला पोटा संबंधित समस्यांना सामोरे जावू शकते. यामुळे प्रवासात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. प्रवासात कोणते पदार्थ खाणे टाळायला पाहिजे हे आज आपण जाणून घेवूया.

* मांसाहार टाळावा

प्रवास करतांना फक्त तळलेल्या पदार्थासह मांसाहार करणे सुद्धा टाळावे. कारण हे पदार्थ मसालेदार असतात.यामुळे हे पचण्यास जड असतात. यामुळे अनेकांना अॅसिडिटी आणि झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे प्रवासात चिकन किंवा मटण यासारखे पदार्थ खाणे टाळावे.

* तेलकट पदार्थ खाणे टाळावे

प्रवास करतांना तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे अनेकांना पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांना पोटाच्या समस्या असतात त्यांनी समोसा, चिप्स यासारखे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

* अंडी आणि दूध

अंडी खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. पण प्रवासा दरम्यान अंडी खाणे टाळावे. कारण यात प्रथिने भरपूर असतात. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. तसेच जर तुम्ही आॅमलेट पॅक करून घेत असाल तर ते लवकर खावे,अन्यथा ते लवकर खराब होते.

* लोणचे खाणे टाळावे

प्रवासा दरम्यान लोणहे खाणे टाळावे. कारण प्रवासात अनेकांना लोणचे खाल्ल्याने पित्त वाढू शकते. म्हणूनच जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असला तर भाजलेले पदार्थ किंवा उकडलेले पदार्थ घेवून जावे. तसेच तुम्ही चिवडा, शेव, मठरी,बिस्किट नाश्त्यासाठी घेवू शकता. हे पदार्थ लवकर खराब होत नाही. जर तुम्ही पवसाळ्यात प्रवास करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT