Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: लाँग वॅकेशन ट्रीपला जायचा प्लान करताय? 'या' गोष्टी विसरू नका

Travel Tips: ट्रिपला जाण्यापूर्वी योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते.

Sameer Amunekar

ट्रिपला जाण्यापूर्वी योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही लाँग ट्रिप, वीकेंड गेटवे किंवा इंटरनॅशनल टूरला जात असाल, तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा प्रवास आरामदायक आणि आनंददायक होईल.

दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं असतं. सततच्या कामाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी आणि मेंदू फ्रेश करण्यासाठी एक छानशी ट्रिप नक्कीच मदत करू शकते.

मग तुम्ही ग्रुप ट्रिप प्लॅन करत असाल किंवा सोलो ट्रिपला जाणार असाल, या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा कोल्ड्रग

बजेट

प्रवास करताना बजेट महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य नियोजन केल्यास कमी खर्चातही तुम्ही छान ट्रिप प्लॅन करू शकता. जर तुमच्या बजेटमध्ये भरपूर खर्च करण्याची तयारी असेल, तर इंटरनॅशनल ट्रिप किंवा लक्झरी रिसॉर्ट्समध्ये सुट्टी एन्जॉय करू शकता.

तिकीट बुकिंग

ट्रिप प्लॅन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट बुकिंग. वेळेत तिकीट न घेतल्यास खर्च वाढतो आणि प्लॅन बिघडू शकतो. त्यामुळे प्रवासाच्या तिथी निश्चित झाल्यावर तिकीट आधीच बुक करणे फायदेशीर ठरते.

डॉक्युमेंट्स

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट (इंटरनॅशनल ट्रिपसाठी) सोबत ठेवा. ट्रिपशी संबंधित बुकिंग्ज (फ्लाइट, ट्रेन, हॉटेल) याची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी ठेवा. ट्रॅव्हल इन्शुरन्स असल्यास उत्तम, विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी.

योग्य राहण्याची आणि अन्नाची सोय करा

हॉटेल, रिसॉर्ट किंवा होमस्टे बुक करताना रिव्ह्यूज वाचा. स्थानिक पदार्थ चाखा पण स्वच्छतेची काळजी घ्या. स्वस्त आणि चांगल्या पर्यायांचा शोध घ्या, जेणेकरून बजेटमध्ये ट्रिप एन्जॉय करता येईल.

नवीन ठिकाणी स्थानिक सिमकार्ड किंवा रोमिंग प्लॅन घ्या. महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि स्थानिक पोलिस स्टेशनची माहिती ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT