Sameer Amunekar
आसाम राज्यात असलेले काझीरंगा हे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याला भेट देण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटन येत असतात.
कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशात स्थित असणारे भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. 940 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे अभयारण्य घनदाट जंगल सारखे आहे.
सरिस्का राष्ट्रीय उद्यान हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात स्थित एक वन्यजीव अभयारण्य आहे. सुमारे 866 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे अभयारण्य विविध प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पश्चिम बंगालमध्ये असलेले सुंदरबन नॅशनल पार्क हे भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेल्या सुंदरबन डेल्टामध्ये स्थित युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. उद्यानाचा भारतीय भाग पश्चिम बंगालमध्ये 1, 330 चौरस किलोमीटर क्षेत्र इतका व्यापला आहे.
कर्नाटकमध्ये असलेले बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे दक्षिण भारतातील कर्नाटकमध्ये स्थित एक वन्यजीव अभयारण्य आहे. सुमारे 874 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हे अभयारण्य पसरले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात स्थित एक वन्यजीव अभयारण्य आहे. हे 625 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले असून भारतातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय वन्यजीव अभयारण्य मानले जाते.