World Environment Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Environment Day: गोव्यातील पर्यावरणाचे जतन अन् संरक्षणासाठी पर्यटकांनी घ्यावी 'या' गोष्टींची काळजी

Puja Bonkile

World Environment Day: दरवर्षी 5 जून हा दिवस पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यवरणाचे रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जमजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

गोवा पर्यटनस्थळांपैकी एक प्रसिद्ध ठिकाणं आहे. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे, नद्या, टेकड्या, तलाव आणि धबधबे आहेत, ज्यांना प्रत्येक हंगामात पर्यटक भेट देतात. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाची सुंदर दृश्ये आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून पोहोचतात.

इको-टूरिझमचे अनेक पर्याय आहेत. पण, टुरिस्ट त्या जागा खराब करत आहेत. या पर्यटन स्थळांच्या पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी पर्यटकांनी सहली दरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. गोव्यातील पर्यावरणाचे कसे रभण करता येइळ हे जाणून घेउया. अ

  • समुद्रकिनाऱ्याची काळजी

गोव्यात (Goa) अनेक पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यांवर मावळत्या सुर्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. येथील बागा, अंजूना,वाटेगर,कळंगुट यासारखे अनेक प्रसिद्ध बीच आहेत जेथे पर्यटक भेट देण्यासाठी येतात. पण बीचवर आल्यावर अनेक पर्यटक कचरा करुन जातात. यामुळे गोव्यातील बीच हे विद्रुप होत आहे. यांमुळे बीचवर काचेच्या बॉटल, खाल्लेल्या पदार्थांचे रिकामे पॅकेट कचरा पेटीमध्ये टाकल्यास येथील बीचच सौंदर्य कायम राहिल.

  • कचरा टाकू नका

बर्‍याचदा पर्यटक ट्रेकिंगसाठी आणि कॅम्पिंगसाठी गोव्यात येतात. तेव्हा ते कचरा तेथेच टाकतात. ते खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेऊन जातात मात्र प्लास्टिक, पॉलिथिन इत्यादी उघड्यावर टाकतात, त्यामुळे घाण पसरते. या कचऱ्यापासून तेथे असणाऱ्या जनावरांनाही धोका निर्माण होतो.

  • पर्यावरणाची हानी

सुट्यांमध्ये भटकंती करण्यासाठी उद्याने, जंगले किंवा कोणत्याही पर्यावरणीय ठिकाणी गेलो तर तेथे छोटे प्राणी असतात. लोक त्यांच्या मौजमजेसाठी या प्राण्यांना त्रास देतात. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होते. फ्लेम-थ्रोटेड बुलबुल हा गोव्याचा राज्य पक्षी आहे. गवा हा गोव्याचा राज्य प्राणी आहे, त्याला गौर किंवा इंडियन बायसन असेही म्हटले जाते.

  • नद्या आणि तलाव दूषित होण्यापासून वाचवा

तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा तेथे असलेल्या नद्या, धबधबे किंवा तलाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोव्यातील धबधबे आणि तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. वस्तू, कापड, प्लास्टिक, पॉलिथिन इत्यादी नद्यांमध्ये फेकून, जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येउ शकते. करतात. यासोबतच या नद्या आणि तलावांचे नैसर्गिक सौंदर्यही बिघडते.

  • वाहन प्रदूषण नियंत्रण

आजच्या तरुणांना रोड ट्रिप खूपच रोमांचक वाटतात. ते वाहनाने भटकंती करण्यासाठी जातात. डिझेल पेट्रोलच्या या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. स्वच्छतेसाठी आणि निरोगी वातावरणासाठी, इको-टुरिझम स्थळी जाताना ट्रेनने प्रवास करावा. वाहनांच्या गुणवत्तेची काळजी घ्या आणि हवा प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • कधी सुरू झाले? 

आनंदी आणि निरोगी जीवनासाठी पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून 1972 रोजी प्रथमच पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. 

  • यावेळची थीम काय आहे? 

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक खास थीम असते. त्यानुसार तो साजरा केला जातो. 2019 मध्ये 'वायु प्रदूषण' ही थीम होती. तर 2020 मध्ये 'जैवविविधता', 2021 मध्ये 'पर्यावरणप्रणालीचे संवर्धन' आणि या वर्षी 2022 मध्ये 'Only One Earth' ही थीम होती. यावेळी प्लास्टिक प्रदूषणावर उपाय हा आहे. ही थीम प्लास्टिक प्रदूषणाच्या उपायावर आधारित आहे. 

  • निसर्गाला धोका वाढत आहे 

जगभरात प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाला धोका वाढत आहे. याला आळा घालण्याच्या उद्देशाने लोकांना पर्यावरणाबाबत जागरूकता यावी आणि निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रवृत्त करता यावे, या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT