Tips For Visiting Goa in Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips For Visiting Goa in Monsoon: पावसाळ्यात गोव्याला फिरायला जाताना 'या' गोष्टी टाळा

Puja Bonkile

Tips For Visiting Goa in Monsoon: पाऊस म्हणजे उन्हाच्या झळांपासून दिलासा देणार असतो. लोकांना पावसाच्या रिमझिम सरींमध्ये हँग आउट आणि कुठेतरी भटंकती करायला करायला आवडते. सर्वांना गोव्याला फिरायला जायला आवडेल. कारण गोवा पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध स्थळ आहे. तुम्हीही जर पावसाळ्यात गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.

पण पावसाळ्यात बीचवर जातांना निष्काळजीपणा करणे चालणार नाही. कारण तुमचा हा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमची ट्रिप अविस्मरणीय करायची असेल तर या गोष्टांची काळजी घेतलीच पाहिजे.

बीचवर जाताना कोणती काळजी घ्यावी

  • किनाऱ्यांना (Beach) भेट देणार्‍यांना समुद्रातला खडकाळ भाग व उंचवटे अशा ठिकाणी जाण्यास मनाई केली जाते. पावसाळ्यात (Monsoon) हे भाग धोकादायक निसरडे बनलेले असतात.

  • लाटांची उंची, तीव्रता यामुळे पाण्यात जाणाऱ्या व्यक्तींना, उग्र बनलेल्या समुद्रात सहजपणे खेचला जाऊ शकतो.

  • पावसाळ्यात गोव्यात बीचवर गेल्यावर पाण्याचा अंदाज घेउनच पाण्यात शिरावे.

  • बीचवर कोणतेही खेळ खेळणे टाळावे. कारण, समुद्र शांत वाटत असेल तरीही अचानक मोठी लाट आपल्यावर येऊन खोल पाण्यात नेऊ शकते.

  • समुद्र किनाऱ्यांना भेट देणार्‍यांनी समुद्ररेषेपासून किमान दहा मीटरचे अंतर राखणे महत्त्वाचे आहे.

  • बीचवर सुरक्षारक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

  • जर तुम्ही बीचवर लहान मुलांना घेउन जात असाल तर पाणी कितीही उथळ भासले तरी लहान मुलांना पाण्यात उतरू देऊ नका. किनाऱ्यावर असतांना लहान मुलांवर लक्ष द्यावे.

  • वीज चमकत असताना पाण्यात उतरणे किंवा पाण्याजवळ जाणे धोकादायक ठरु शकते.

  • समुद्र किनाऱ्यावरच्या खडकांवर जाणे टाळावे कारण पावसाळ्यात या खडकांवर शेवाळ येउन ते अधिक निसरडे बनलेले असतात.

  • जून ते सप्टेंबरपर्यंतच्या काळात समुद्र जरी शांत वाटत असला तरी अचानक मोठी समुद्राची लाट येऊन खोल पाण्यात खेचुन घेऊ शकते.त्यामुळे बीचवर गेल्यावर सावध राहावे.

  • जर तुम्ही मद्यपान करुन बीटवर जात असाल तर कोणाला तरी सोबत घेउन जावे. अन्यथा बीचवर जाणे टाळावेच.

  • किनाऱ्यावर (Beach) प्रवेश करत असताना तिथे लिहिलेल्या सुरक्षा सूचनांचे आणि चिन्हांचे पालन करणे गरजेचे आहे.

  • समुद्रात दुपारी 12 ते 4 पर्यंत जाणे टाळावे. दुपारच्यावेळी समुद्र खवळलेला असतो कारण यावेळी वाऱ्याची गती जास्त असते. 

  • जीवरक्षक किंवा लोकं नसलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा समुद्रकिनाऱ्यावर जावे व एकटे पोहणे टाळावे.

दरम्यान, गोव्‍यात मॉन्‍सून सक्रिय होऊनही अद्याप पावसाने जोर धरलेला नाही, हा अरबी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम आहे. त्‍यामुळेच ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे, अशी माहिती हवामान अभ्‍यासक डॉ. एम. रमेशकुमार यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

दरम्‍यान, चक्रीवादळाचा थेट परिणाम गोव्‍यावर होणार नसला तरी समुद्र खवळलेला असून, उंचच उंच लाटा उसळत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

गोव्‍यात 22 जूननंतर जोरदार पाऊस सुरू होईल, असा अंदाजही डॉ. रमेशकुमार यांनी वर्तविला आहे. दरम्‍यान, हवामान विभागाने मॉन्‍सून सक्रिय झाला आहे, यात कोणतीही दुविधा नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले असून, राज्‍यभरात नोंद झालेले पर्जन्‍य हे समाधानकारक असल्‍याचे म्‍हटले आहे.

सामान्यतः जुलै व ऑगस्‍ट हे दोन महिने मोठ्या पावसाचे मानले जातात. या दोन महिन्‍यांत सर्वाधिक पाऊस नोंदला जातो.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गोव्यात मंगळवारपर्यंत समुद्राला भरती येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, आपत्कालीन स्थितीसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. नागरिक, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT