Nails Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beautiful Nails Tips: नखांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती टिप्स

जर तुमचे नख पिवळे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता.

दैनिक गोमन्तक

नखांचे (Nail) आरोग्य चांगले ठेवणे अवश्यक आहे. यामुळे अनेक आजारापासून बचाव होऊ शकतो. अनेकवेळा आपल्या चुकीची दिनचर्या, नेल पेंटचा वापर किंवा जास्त वेळ नेल पेंट ठेवणे हे देखील कारण असू शकते. पिवळे नखे दिसायला खूप वाईट दिसतात. तसेच पिवळे नखे असेल तर ते एखाद्या आजारचे लक्षण असू शकते. नखांचा पांढरा शुभ्र रंग टिकून राहण्यासाठी घरगुती पद्धतींचा वापर करावा.

* नखांचा पिवळेपना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

1) लिंबूमध्ये (Lemon) नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात. यांचा वापर करून तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी एका भांड्यात कोमट पाण्यात एक लिंबू पिळून त्यात लिंबू तेलाचे काही थेंब टाकावे. साधारण 15 मिनिटे या पाण्यात हात ठेवावा. यानंतर नखे टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ करावे. यानंतर कोमट पाण्याने हात धुवावे आणि मॉइश्चरायझर लावावे. आठवड्यातून एकदा असे केल्यास नखांचा पिवळेपना कमी होतो.

2) टूथपेस्टचा वापर करून सुद्धा तुम्ही नखांचा पिवळेपना कमी करू शकता. यासाठी नखांवर टूथपेस्ट लावावे आणि टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ करावे. यामुळे नखांची चमक कायम राहते.

3 ) व्हाईट व्हीनेगर नखांची चमक ठिकून राहण्यासाठी मदत करते. यासाठी कोमट पाण्यात व्हीनेगर टाकावे. यानंतर तुमचे हात या पाण्यात सुमारे 10 मिनिटे ठेवावे. काही वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

4 ) बदाम आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणात मिक्स करावे. रोज झोपताना नखांवर या तेलाने मालीश करावी. यामुळे नखांची (Nails) चमक कायम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT