जर आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण कमी झाले किंवा व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असेल तर आपल्या थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते. या व्यतिरिक्त कमी थायरॉईड हार्मोन्स देखील कारणीभूत ठरू शकतात. हार्मोन्समधील बदलांमुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये काम करण्यात बदल दिसून येतो.
थायरॉईड विकाराने ग्रस्त असणाऱ्यांनी आहारामध्ये काय घ्यावे?
अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा.ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खा.
आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गाईच्या दुधाचा समावेश करावा. त्यामुळे आयोडिनची योग्य पातळी राखली जाईल.
गॉइटरसारखी गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून सोयाबीन, सॉय उत्पादनं, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, टíनप्स, पीच, शेंगदाणे, मुळा हे गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ शिजवल्याने त्यातले घटक निकामी होतात, कारण ते उष्णता संवेदनशील असतात. परंतु हे पदार्थ केव्हा तरी आणि शिजवलेल्या स्थितीत खाणंच योग्य.
नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या सूपच्या आणि रसाच्या स्वरूपात खाव्यात. टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री ही पिवळी-नािरगी फळं खावीत. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा, अळशी, तीळासारख्या तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं लो-फॅट दूध/गाईचं दूध, ताक, दही आदींच्या सेवनाने आपण निरोगी राहतो.
हायपरथायरॉईड साठी योगासने आणि प्राणायाम:-
सेतूबंधासन, शवासन, मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार ,उज्जयी, भ्रमरी (भ्रमराप्रमाणे श्वसन), नाडी शोधन आणि शीतली आणि शीतकारी, सर्वांगासन,अधोमुखासन, विपरीतकरणी, शीर्षासन, मत्स्यासन, हलासन, मार्जरासन इत्यादी आसनाचा उपयोग होतो.
(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.