Taliban Effect On Dry fruits: करा 'या' देशी पदार्थांचा वापर  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Taliban Effect On Dry fruits: करा 'या' देशी पदार्थांचा वापर

तिळाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) काय परिणाम होणार असा प्रश्न आधीच उपस्थित झाला होता. आणि आता तालीबान्यांनी पुर्ण अफगाणचा ताबा घेतल्याने भारताशी व्यापार (Business) बंद केला आहे. आता ना काबूलला (Kabul) निर्यात करता येणार ना तिथून काही आयात करता येणार. यामुळे बाजारात सुका मेव्याचे (Dry Fruits) भाव गगनाला भिडू लागले आहे. यामुळे तुम्ही जर काळजी करत असला तर ती करायची गरज नाही कारण ड्राय फ्रुट्सला पर्याय म्हणून आपण ड्राय सीड्सचा वापर करू शकतो. ड्राय सीड्समुळे आपले आरोग्य चांगले राहते. चला तर मग जाणून घेवूया कोणते आहेत ते ड्राय सीड्सबद्दल

* तीळ

तीळामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. यात पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदया संबंधित आजार दूर ठेवतात. त्यात व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो तसेच मधुमेह, कर्करोगासारख्या आजारांना दूर ठेवते. तीळात कॅल्शियम, लिनोलिक आणि ओमेगा-6 अॅसिड देखील भरपूर प्रमाणात असते.

* सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफूल बियांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. यात अँटिऑक्सिडेंटचे भरपूर असल्याने शरीरातील पेशीचे आरोय चांगले राहतात. आपल्या त्वचेसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी सूर्यफूलयांच्या बिया फायदेशीर असतात. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. यातील मॅग्नेशियम हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत.

* भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर असतात. यामध्ये कॅरोटीनोईड्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते.भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटॅमिन बी चे प्रमाण भरपूर असते. याशिवाय ट्रिप्टोफॅन नावाचे अॅसिड असते यामुळे ताण कमी करण्यास मदत करते

* जवस

जवसामध्ये ओमेगा 3 चे प्रमाण भरपूर असते. यात अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असल्याने विशेष शाकाहारी लोकांसाठी फायदेशीर आहे. जवसचे सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होते आणि स्तनाचा कर्करोगापासून बचाव होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT