Restful And Deep Sleep Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Restful And Deep Sleep: 'हे' उपाय देतील तुम्हाला शांत आणि गाढ झोप

आपला मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना योग्य मात्रेमध्ये विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आपला मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना योग्य मात्रेमध्ये विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा आपले शरीर त्यामधील घातक द्रव्ये फिल्टर करण्याचे काम करीत असते. म्हणूनच शांत, गाढ झोप लागून आपण जागे होतो, तेव्हा आपले शरीर आपल्याला हलके वाटते, आणि मनही प्रसन्न असते. उत्तम निद्रा ही केवळ शरीरातील अवयवांसाठीच नाही, तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय आवश्यक आहे. जर झोप अपूर्ण झाली असली, तर त्याचे दुष्परिणाम सर्वप्रथम त्वचेवर दिसून येतात.

डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे. डोळे लालसर दिसू लागणे, किंवा चेहऱ्यावर हलकी सूज दिसून येणे, ही आवश्यक तितकी झोप मिळत नसल्याची लक्षणे आहेत. अपुऱ्या झोपेचे शारीरिक नाही, तर मानसिक दुष्परिणामही होत असतात. जेव्हा आपल्याला पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळत नाही, तेव्हा आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला मेंदू आपल्या भावना ‘ प्रोसेस ‘ करीत असतो. ह्याच भावना आपल्या मनामध्ये किंवा मेंदुमध्ये आठवणींच्या रूपात ‘स्टोअर’ केल्या जात असतात. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा ही प्रक्रिया गडबडते, त्यामुळे व्यक्ती अतिशय लहरी बनतो.

झोपण्याआधी काय करू नये म्हणजे शांत आणि गाढ झोप लागते ते आपण पाहूया.

• चहा किंवा कॉफी पिऊ नये - अनेकांना झोपायच्या आधी काहीतरी खायची किंवा प्यायची सवय असते, मात्र यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असतो. झोपण्याआधी चहा किंवा कॉफी पिऊ नये. कॅफेनच्या सेवनाने झोपेवर परिणाम होतो. मात्र कॅफेन म्हटलं की आपल्याला कॉफी आठवते पण अन्य काही पण मध्येही असू शकतो जसं की डार्क चॉकलेट ग्रीन टी आणि साध्या चहा मध्येही कॅफे नसू शकतो त्याचे नियुक्त शीतपेयही असतात अशी सगळी पेय झोपण्याआधी टाळायला हवीत

• प्रमाणपेक्षा जास्त गोड खाणे- रात्रीच्या वेळी गोड ही खाणे, साखरयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्तात साखरेचा प्रमाण वाढल्यानंतर शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. त्यामुळे रात्री गोड खाऊ नका.

• तिखट पदार्थ खाणे- बऱ्याच जणांना रात्रीच्या आहारात पावभाजी-मिसळ, तेलकट, झणझणीत पदार्थ खाण्याची सवय असते. अशा पदार्थांचे नियमित सेवन केल्यास या पदार्थामुळेछातीत जळजळ जाणवू शकते, आम्ल पित्ताचा त्रास होऊ शकतो. परिणामी यामुळे झोप येत नाही.

• मोबाईल, टीव्हीचा वापर- हल्ली बऱ्याच जणांना अंथरुणात पडून मोबाईल वापरायची,टीव्ही पाहायची सवय असते, जी अत्यंत घटक असते. मोबाईल स्क्रीनवरील प्रकाश हा डोळ्यांना हानिकारक आणि निद्रानाश करणारा असतो. अंधारात मोबाईल वापरला तर हा प्रकाश डोळ्यांचे तेज कमी करतो, परिणामी दृष्टी अंधुक होते.

• आम्लयुक्त पदार्थाचे सेवन- झोपण्यापूर्वी आम्लयुक्त पदार्थाचे सेवन टाळायला हवं. त्या पदार्थामुळे छातीत जळजळ जाणवू शकते. तसेच रात्रीच्या वेळी चीज खाऊ नये. चीजमध्ये अमिनो ऍसिड असतं आणि यातल्या काही घटकांमुळे ताण वाढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT