Indigestion Causes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Indigestion Causes: सतत अपचनाची समस्या भेडसावते? मग 'ही' असू शकतात कारणे

बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Indigestion Causes: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराचे सर्व अवयव निरोगी आणि तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. तब्येत नीट ठेवण्यासाठी पोट तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजकाल अपचन, आम्लपित्त आणि छातीत जळजळ हे सर्वसामान्य आजार झाले आहेत.

याचा त्रास अनेकांना होत आहे. अपचन होण्याची अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे, ते सामान्य उपचाराने बरे होते. आज आम्ही तुम्हाला अपचनाची मुख्य कारणे सांगत आहोत.

1. अल्सर

हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पेप्टिक अल्सरनंतरही अपचनाची समस्या असते. पेप्टिक अल्सर ही पोटात एक प्रकारची जखम असते. पेप्टिक अल्सर जेव्हा अन्न पचवणारे ऍसिड लहान आतड्याला नुकसान करतात तेव्हा होतो. ज्यामुळे एक जखम तयार होते. पेप्टिक अल्सरमुळे अपचन, सूज येणे, गॅस यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

2. यकृताशी संबंधित समस्या

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. जेव्हा ते खराब होते, तेव्हा संपूर्ण पचनसंस्थेवर परिणाम होतो. फॅटी लिव्हरसारख्या यकृताशी संबंधित समस्यांमुळे अपचन होऊ शकते.

3. जास्त खाणे

अनेक वेळा लोक भुकेपेक्षा जास्त अन्न खातात, ज्यामुळे अपचन होते. बाहेर किंवा घरात अनेकवेळा जास्त जेवतो. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो.

4. मद्यपान आणि धूम्रपान

धूम्रपान करणार्‍यांना आणि दारू पिणार्‍यांनाही अपचनाची समस्या भेडसावते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि अपचनाची समस्या होऊ शकते.

5. जेवल्यानंतर लगेच झोपणे

अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपू नये. खाल्ल्यानंतर माणसाने काही वेळ चालावे, त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने अपचन होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT