New Year 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year 2024: नवीन वर्षात 'या' गोष्टी असणार 'स्पेशल', वाचा यादी

देशभरात नववर्षाच दिमाखात स्वागत करण्यात आले आहे.

Puja Bonkile

New Year 2024: देशभरात नववर्षाच दिमाखात स्वागत करण्यात आले आहे. नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करत ,एकमेकांना शुभेच्छा देत नव वर्षाचे स्वागत केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण वर्षभरात कोणत्या स्पेशल गोष्टी असणार आहेत हे जाणून घेऊया.

22 जानेवारी

अयोध्येच्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापणा होणार. भगवान श्रीराम या भव्य मंदिरात त्यांच्या बालसदृश रूपात निवास करतील.

8 फेब्रुवारी

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इम्रान खान तुरुंगातून आपल्या नावाची घोषणा करू शकले असते, परंतु निवडणूक आयोगाने यांचे नामांकन फेटाळले.

10 मार्च

ऑस्कर सोहळा 10 मार्च रोजी हॉलिवूड, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बिटर येथे होणार आहे. 96 वा ऑस्कर सोहळा 200 हून अधिक देशांमध्ये प्रसारित होणार आहे.

एप्रिल

18वी लोकसभा निवडणूक एप्रिल ते मे पर्यंत अपेक्षित आहे. वर्तमान लोकसभा कार्यकाल 16 जून 2024 रोजी घडत आहे. मागील लोकसभा निवडणूक 2019 ला झाली होती.

मे

77वां कान्स फिल्म फेस्टिवल 14 ते 25 मे रोजी होणार आहे.

जून

टी-20 पुरुष विश्व कप 2024 चे आयोजन 6 ते 30 जून वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे केले जाणार आहे.

जुलै

समर ऑलेम्पिक खेळांचे आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत पॅरिस (फ्रांस) मध्ये होणार.

ऑगस्ट

समर पैरा ऑलेम्पिक 28 ऑगस्ट ते 8 संप्टेंबरपर्यंत पॅरिसमध्ये होणार आहेत.

सप्टेंबर

टी-20 महिला विश्व कपचे आयोजन सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेशमध्ये होईल.

ऑक्टोबर

नासाचे यूरोपा क्लिपर वैज्ञानिक ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार. यावरून चंद्र जीवनासाठी योग्य परिस्थिती राखू शकतो की नाही हे नासा शोधून काढेल.

नोव्हेंबर

अमेरिकेत 5 नोव्हेंबर निवडणूका पार पडणार आहेत. त्यानंतर अमेरिकेला नवा राष्ट्रपती मिळेल.

डिसेंबर

इस्त्रोकडून वीन्स ऑर्बिटर मिशन सुरू होईल. शुक्रच्या वातावरणाचे अध्ययन करण्यासाठी शुक्रयान लॉन्च केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

Rakul Preet Singh At IFFI: '..पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही'; रकुलप्रीतने Nepotism बद्दल मांडले स्पष्ट मत

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

SCROLL FOR NEXT