ही आहेत 'व्हिटॅमिन डी' समृद्ध पदार्थ

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

ही आहेत 'व्हिटॅमिन डी' समृद्ध पदार्थ

हिवाळ्यात (Winter) सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळणे कठीण होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या काळात निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डि शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे हाडे (Bones) मजबूत राहतात. व्हिटॅमिन डीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. व्हिटॅमिन डीला सनस्क्रीन (Sunscreen) व्हिटॅमिन म्हणतात. जेव्हा आपण सूर्याची किरणे घेतो तेव्हा आपले शरीर स्वत:तच व्हिटॅमिन डी तयार करण्यास सुरुवात करते. पण हिवाळ्यात (Winter) सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळणे कठीण होऊ शकते. हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवु शकते. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या पदार्थांचा (Food) समावेश करावा.दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते.

* अंडी

अंडी व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत मानला जातो. तसे अंडी खाणे शरीरासाठी लाभदायी असते. अंड्यातील पिवळ्या बलकामद्धे व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.यामुळे नियमित 1 अंडे खावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कमी होते.

* दही

दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी कमतरता जाणवणार नाही.

* दूध

दूधचे सेवन त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. गाईच्या दुधात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. रोज सकाळी एक ग्लास गाईचे दूध पिल्याने व्हिटॅमिन डीच्या कामरतेवर मात करता येते.

* मशरूम

यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 5, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम असते.

* संत्रा

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे अनेक आजार दूर राहतात. तसेच संत्र्याचा रस पिल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता कमी होण्यास मदत मिळते.

* ओट्स

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. यात भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माउथ ऑर्गनवर वाजवली राष्ट्रगीताची धून; प्रतापसिंग राणेंचा 'हा' व्हिडीओ सध्या होतोय Viral

India vs Pakistan: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत-पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला, आशिया कपमधील लढतीला भारत सरकारचा ग्रीन सिग्नल

Nigeria Mosque Attack: नमाजावेळी मशिदीवर गोळीबार; 50 जण ठार, 60 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Assagao Incident: उघड्या विहिरीत पडून 54 वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू, आसगावातील धक्कादायक घटना; स्थानिकांमध्ये संताप

Asia Cup 2025: ‘त्यानं आणखी काय करायला हवंय?’; आशिया कपसाठी मुलाची निवड न झाल्यानं श्रेयस अय्यरच्या वडिलांचा संताप!

SCROLL FOR NEXT