जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीभाताचा घ्या आस्वाद  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीभाताचा घ्या आस्वाद

जन्माष्टमीचा (Janmashtami ) उत्सव खूप आनंदाने साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

जन्माष्टमी म्हटले की डोळ्यासमोर येत ते दहीहंडी, लोणी, दहीभात. संपूर्ण देशात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बाळ गोपाळ यांना लोणी (Butter) खूप प्रिय आहे. यामुळेच कान्हाला 'माखण चोर' असे बोलल्या जाते. आपल्या मनात काही गोष्टी खूप खोलवर रुजलेल्या, संस्कारित झालेल्या असतात. एखादी गोष्ट आठवताच किंवा नजरेसमोर येताच, आठवणींच्या, त्या संस्कार संदर्भांच्या धाग्यांचा झगझगीत पट झर्रकन् उलगडून त्या विश्वात घेऊन जातो. कदंब वृक्षाची आठवण होताच संदर्भ जोडला जातो तो पौराणिक कथा, काव्यात उल्लेखलेल्या कदंबाशी! आणि श्रीकृष्णाशी! झिरमिरत्या पावसात त्याचा वाढदिवस आणि त्यावर फुललेल्या पहिल्या फुलांचा जन्मोत्सव साजरा करताना मुलांच्या डोळ्यांतला तो अवर्णनीय आनंद शब्दातीत! कदंब छान सावली देणारा, लवकर वाढणारा आहे, हे कळल्यावर नगरपालिकेनं गावात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कदंब लावला. वा!! मग काय, गावात फिरताना कुठे कदंब दिसला, की मनातला तोच तो पणा कधी पळून जायचा, ते कळायचंच नाही. ओळखीचं, जिव्हाळ्याचं कुणी भेटलं की असंच छान वाटतं ना! आणि मनात फुलतात सुगंधी, प्रसन्न फुलं!

कदंब फुलांचे कंदूक (चेंडू) करून आपल्या सवंगड्यांसोबत खेळणारा, कालिया मर्दनासाठी कदंबावरून यमुनेच्या डोहात उडी घेणारा, त्यानंतर विष दूर करण्यासाठी कदंबाचाच आश्रय घेणारा श्रीकृष्ण! त्याच्या पाव्याचे मंजूळ स्वर कदंबाखालीच आसमंतात गुंजत असत... असे कितीतरी संदर्भ आठवून जातात. बरेचदा मनात यायचं, आपल्या जवळपास कदंब असायला हवा. मग, ठरवूनच एका रोपवाटिकेतून कदंबाची रोपं आणून जवळपासच्या परिसरात लावून वाढवली. इचलकरंजीतील आमच्या आंतरभारती विद्यालयातही कदंब लावला. तो फुलायला लागल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला.

झिरमिरत्या पावसात त्याचा वाढदिवस आणि त्यावर फुललेल्या पहिल्या फुलांचा जन्मोत्सव साजरा करताना मुलांच्या डोळ्यांतला तो अवर्णनीय आनंद शब्दातीत! कदंब छान सावली देणारा, लवकर वाढणारा आहे, हे कळल्यावर नगरपालिकेनं गावात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कदंब लावला. वा!! मग काय, गावात फिरताना कुठे कदंब दिसला, की मनातला तोच तो पणा कधी पळून जायचा, ते कळायचंच नाही. ओळखीचं, जिव्हाळ्याचं कुणी भेटलं की असंच छान वाटतं ना! आणि मनात फुलतात सुगंधी, प्रसन्न फुलं! बाळ गोपळला नैवेद्य म्हणून दहीभात दाखवल्या जाते. तसेच दहीभात हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेवूया दहिभाताचे महत्व आणि फायदे.

* दहीभात

साहित्य

  • दोन वाट्या गार भात (रात्रीचा असेल तरी चालेल. ताजा भातही छान लागतो.)

  • एक वाटी सायीचे दही

  • एक वाटी सायीसह दूध

  • दोन हिरव्या मिरच्या

  • चवीनुसार मीठ

  • चवीनुसार साखर

  • चमचाभर साजूक तूप

  • जिरे

  • हिंग

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी

  • डाळिंबाचे दाणे

  • बारीक शेव दोन चमचे.

* कृती

भात मोकळा करून मीठ, साखर, दही व दूध चांगले मिक्स करून घ्यावे. तूप, हिंग, जिऱ्याची फोडणी करून भातावर घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून भातात मिक्स करून घ्यावे. खायला देतांना त्यावर शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव टाकल्यास त्याची चव अधिक वाढते.

* दहीभात खाण्याचे फायदे

* दहीभात खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

* उन्हाळ्याच्या दिवसांत दहीभात खाणे आरोग्यासाठी चांगले असते. कारण दह्यामध्ये असलेले खनिजे शरीर थंड ठेवण्यास मदत करते.

* दहीभात खाल्ल्याने मनातील भीती आणि ताण कमी होण्यास मदत मिळते.

* दहीभातात फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे लवकर भूक लागत नाही. तुम्ही जर दुपारच्या जेवणात दहीभात खाल्यास रात्रीपर्यंत पोट भरलेले राहते. यामुळे आपण वजन नियंत्रित करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT