Take 'this' remedy to prevent vaginal infections Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Menstruation Care Tips: योनीमार्गांचे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

मासिक पाळीच्या (Menstruation) काळात दिवसभर एकच पॅड वापरणे आरोग्यास (Health) हानिकारक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

Menstruation Care Tips: मासिक पाळी (Menstruation) ही नैसर्गि प्रक्रिया आहे. याचा संबध थेट महिलांच्या आरोग्याशी येतो. यामुळे प्रत्येक महिलांनी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धावपळीच्या काळात सध्या स्त्रियांना (Women) दिवसभर शिक्षण किंवा कामासाठी बाहेर राहावे लागते. यामुळे मासिक पाळी (Menstruation) दरम्यान दिवसभर एकच पॅड वापरणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. तर गावाकडच्या महिला अजून सुद्धा मासिक पाळीच्या (Menstruation) दिवासत कापड वापरतात. परंतु योग्य ती काळजी (care) न घेतल्यास अनेक आजार (Disease) उद्भवू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार वेगाने पसरतात. तसेच वातावरणातील अद्रतेमुळे आपले कपडे ओलसर राहतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात योनि मार्गाने संसर्ग वाढण्याची शक्यता असते. यामुकले महिलांनी मासिक पाळीच्या (Menstruation) दरम्यान शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

* कोरडे राहणार याची काळजी

मासिक पाळीच्या (Menstruation) काळात महिलांनी आपला खाजगी भाग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यात हवामानात आद्रता कायम राहते. अशा वेळी महिलांनी टॉयलेटला गेल्यानंतर ती जागा स्वच्छ (Clean) करावी. यासाठी कागदाचा किंवा टिशू पेपरचा वापर करावा. त्यानंतरच पॅड वापरावा. अशी काळजी घेतल्यास संसर्ग होणे टाळता येईल.

* सॅनिटरी पॅड बदलत राहणे

मासिक पाळीच्या (Menstruation) काळात महिलांनी दिवसभर एकच पॅड वापरू नये. यामुळे खाजगी जागेला इफेक्शन होऊ शकते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत अधिक संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे दिवसातून तीन ते चार वेळा पॅड बदलणे गरजेचे आहे.

* शारीरिक स्वच्छता ठेवणे गरजेचे

मासिक पाळीच्या (Menstruation) काळात शारीरिक (Body) स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. पावसाळ्यात तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात होणारा रक्तस्त्राव महिलांच्या अंतर्गत भागात देखील लागण्याची भीती असते. यामुळेच खाजगी जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास योनीद्वारे दुर्गंध येण्याची शक्यता असते. यामुळेच सॅनिटरी पॅड (Pad) बदलण्या आधी खाजगी भाग भरपूर पाण्याने स्वच्छ करावे.

* खाजगी जागी साबण वापरणे टाळा

मासिक पाळीच्या काळात महिलांनी खाजगी जागा स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. यामुळे खाजगी जागा स्वच्छ करण्यासाठी साबण न वापरता बाजारात खाजगी भागाची स्वच्छ करण्यासाठी काही साधने उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा. परंतु अतिवापर देखील करू नये. कोमट पाण्याने धुतले तरी खाजगी जागा स्वच्छ होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT