swollen Legs Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swollen Legs: पायावरची सूज असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

पायवर सुज येणे किडनी संबंधित आजाराचे लक्षण असून शकते.

Puja Bonkile

Swollen Legs: तुमच्या पायावर सुज असेल तर ही बातमी नक्की वाचाच. कारण किडनी संबंधित आजार असल्यास पायावर सुज येऊ शकते. जर पायावर बोटाने दाबल्यावर त्वचा आत जात असेल तर वेळीच सावध व्हा.

यामुळे किडनी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. किडनी संबंधित आजार ओळखण्यासाठी शरीरातील होणाऱ्या बदलांवर लक्ष देणे गरजेचे आहे. तुमची किडनी निरोगी आहे की नाही हे कसे ओळखाल जाणून घेऊया.

हाय ब्रल्ड प्रेशर आणि डायबिटिजच्या रुग्णांना किडनीशी संबंधित आजार उद्भवतात. कारण हाय ब्रल्ड प्रेशरमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते.

डायबिटिजच्या रुग्णांमध्ये रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते.

किडनी निकामी होण्याचे पहिले लक्षण म्हणजे वॉटर रिटेंशन होणे. ज्यामुळे पायावर सूज येते. जर तुम्हाला तुमच्या पायावर सूज येत असेल तर लगेच आरोग्य तज्ञांशी संपर्क साधावा.

पायात सूज येणे हे किडनीच्या आजाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काही वेळ पाय भिंतीचा आधार घेऊन वर ठेवू शकता.

ही समस्या पुन्हा उद्भवल्यास आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. किडनी संबंधित आजार शोधण्यासाठी तुम्ही दोन टेस्ट करू शकता.

  • या दोन चाचण्यांद्वारे किडनी चांगली आहे की खराब जाणून घेऊ शकता

ब्लड टेस्ट

रक्तातील क्रिएटिनिचे प्रमाण वाढल्यास किडनी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

यूरिन टेस्ट

युरिन टेस्ट द्वारे तुम्ही तुम्ही किडनीचे आरोग्य चांगले आहे की नाही हे तपासु शकता.

पायावर कोणत्याही प्रकारची सूज असल्यास दुर्लक्ष करू नका. कारण यासारख्या छोट्या गोष्टी देखील मोठ्या आजारांचे कारण बनू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT