Cornflakes
Cornflakes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cornflakes Side Effects: कॉर्नफ्लेक्स आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, संशोधनात धक्कादायक खुलासा

दैनिक गोमन्तक

Cornflakes Side Effects: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वात मोठा परिणाम आपल्या अन्नावर होतो. आजकाल लोकांकडे नाश्ता किंवा दिवसातून तीन वेळा जेवण बनवायला फारसा वेळ नसतो. 

आजकाल लोक अन्नासाठी बाहेरच्या पदार्थांवर अधिक अवलंबून असतात. आजकाल लोकांना नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स खायला आवडतात. काही लोक त्यात दूध मिक्स करुन खातात. असे म्हटले जाते की कॉर्नफ्लेक्स फक्त मक्याच्या पिठापासून बनवले जातात, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. 

  • नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स सेवन

नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स अधिक आरोग्यदायी (Health) बनवण्यासाठी बहुतेक लोक त्यात स्ट्रॉबेरी, फळं, बदाम आणि मध मिक्स करतात. कॉर्नफ्लेक्समध्ये आढळणारी साखर आणि मीठ टाकले जाते. त्यावर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते. 

  • लठ्ठपणा, हृदयविकार अन् मधुमेहाचा धोका वाढू शकतो


कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषक घटक नसतात. तसेच त्यात फायबरचे प्रमाणही कमी असते. तुम्ही पाहिलेच असेल की कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यानंतर लोकांना लवकर भूक लागते.  पोषणतज्ञांच्या मते कॉर्नफ्लेक्समध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो.

Cornflakes
  • कॉर्नफ्लेक्स मधुमेहींनी खाणे टाळावे


हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ डॉ. फ्रँक हू यांच्या मते, कॉर्नफ्लेक्समधील साखर आणि मीठ उच्च रक्तदाब आणि जळजळ, मधुमेह आणि फॅटी लिव्हर, लठ्ठपणाचा धोका वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आणि स्ट्रोकचा धोका असतो. 

कॉर्नफ्लेक्स कॉर्नच्या टोस्टिंग फ्लेक्सपासून बनवले जातात. कॉर्नफ्लेक्स हे प्रोसेस केलेले अन्न आहे. जे सहसा दूध आणि साखरेसह खाल्ले जाते. इंग्लंडमधील मँचेस्टर येथील ट्रॅफर्ड पार्क कारखान्यात कॉर्नफ्लेक्सचे सर्वाधिक उत्पादन होते. 

 न्यूट्रिशन

कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतो. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हे मोजमाप आहे. ज्याद्वारे आपल्याला कळते की अन्नामध्ये साखरेची पातळी किती आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Agriculture : गोव्यातील काजूचे प्रस्‍थ

SCROLL FOR NEXT