Swasthyam 2022 : आधुनिक, स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताण-तणाव दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत 9 ते 11 डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.
ध्यान-धारणेविषयी शास्त्रीय माहिती
मनुष्याला अनेक शारीरिक व्याधी या ‘मनाच्या अस्वस्थे’मुळे होतात. ताण - तणाव, मनात सुरु असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यान - धारणा आवश्यक आहे. (Swasthyam Wellness)
शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम
शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी - जास्त झाल्याने शरिरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे जाणून घेऊ शकता. (Global Swasthyam)
उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग
मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टीने मानवी जीवनाचं योग्य संतुलन राखलं जातं.
अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध
अध्यात्मनातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरिक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.
सकस आहार आणि आरोग्य
धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.
गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध
आपल्या आवडीचं गाणं किंवा संगीत ऐकलं की, मन प्रसन्न होतं, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन - संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.
मानसिक विकार म्हणजे काय?
मानसिक आजार किंवा विकार ही एक वैद्यकीय स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीचे विचार, भाव-भावना, मनःस्थिती, आणि दैनंदिन वर्तणुकीत बदल करू शकते. एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटांना व समस्यांना पूर्ण क्षमतेने सामोरे जाऊ शकत नाही. मानसिक विकाराने सर्व वयोगटातील, विभिन्न लिंगी सर्व समुदाय व समूहातील लोक प्रभावित होऊ शकतात.
मानसिक आरोग्याची देशातील स्थिती
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतातील 7.5% लोकसंख्या ही कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहे. जगभरातील मानसिक आणि मज्जातंतू संबंधित आजारातील भारताचा वाटा 15 % आहे. भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे निव्वळ तीन मानसोपचारतज्ज्ञ असून मानसशास्त्रज्ञांची संख्या तर त्याहून कमी आहे, असेही या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. अर्थात, प्रती एक लाख व्यक्तीमागे 5.6 मनसोपचारतज्ज्ञ असले पाहिजेत या, निकषांनुसार हे प्रमाण 18 पटीने कमी आहे.
मनःशांतीसाठी ध्यान-धारणा
प्रतिकूल परिस्थिती किंवा समस्या निर्माण झाल्यावर आपल्या मनामध्ये भावभावनांचा कल्लोळ होतो. अशावेळी आपण भावनिक होऊन, चालू वर्तमानकाळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये व गुण विसरून जातो. आपण सतत हाच विचार करत रहातो, की हा प्रसंग किंवा घटना माझ्या जीवनात का घडली, या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे आणि पुढे उद्या पुन्हा अशी समस्या व प्रसंग आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण काय करायला हवे. अशा विचारांमुळे व प्रश्नांमुळे आपण योग्य, शास्त्रीय, परिस्थितीनुसार व जाणीवपूर्वक विचार करत नाही. अशावेळी ध्यान-धारणेमुळे आपल्या मनातील ताण-तणाव दूर होऊन मन प्रसन्न, चिंतामुक्त आणि काळजीमुक्त होते. ध्यान-धारणेच्या सरावामुळे चालू वर्तमानकाळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये आणि आपल्या गुणांची आपल्याला जाणीव होते.
ध्यान-धारणेमुळे आपले मन सशक्त होते, त्यामुळे आपल्यापुढे कोणतेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तरी आपण प्रसन्न राहू शकतो. नियमित ध्यान-धारणेमुळे आपल्या मनामध्ये एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेमुळेच आपण अनेक संकटांचा आणि समस्यांचा प्रभावीपणे सामना करू शकतो. सततच्या ध्यान-धारणेमुळे आपली भावनिक लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच, ध्यान-धारणा हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.
‘ध्यान-धारणे’साठी कोणती तयारी करावी?
ध्यान-धारणेसाठी शांत परिसर असलेली जागा निवडावी, जेणेकरून शांत ठिकाणी ध्यान-धारणा करताना कोणताही अडथळा न येता पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
ध्यान-धारणेचा सराव नियमित करावा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. नियमित ध्यान-धारणा केल्याने आपल्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करता येणे शक्य होते.
ध्यान-धारणा करण्याआधी थोडा हलका शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. शारीरिक व्यायामामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
असे व्हा सहभागी...
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.
https://www.globalswasthyam.com/
उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !
Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam
Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/
Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam
LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.