summer tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: 'समुद्रस्नान' उष्णतेपासून सुटका देणारा मौजेचा उपाय

समुद्रात पोहण्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.

दैनिक गोमन्तक

उन्हाळा सुरू होताच गोव्यातील अनेक वयस्करांना ‘खारें उदक न्हावपा’चे वेध लागतात. समुद्रस्नान हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा (व आनंदाचाही नक्कीच) वार्षिक रिवाज असतो. किनाऱ्यापासून दूर असलेल्या गावातील लोकदेखील या दिवसात, किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नातेवाईकांकडे येऊन राहतात. समुद्रस्नानाचा हा रिवाज काही दिवस चालत असतो. आरोग्यविषयक (Health) अनेक फायद्यांसाठी समुद्राच्या पाण्यात स्नान करणे ही ग्रीक लोकांचीही एक आदरणीय प्रथा होती. नुसते ताजेतवाने होण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी खनिजसमृद्ध असणाऱ्या आणि सौंदर्याला उठाव आणणाऱ्या समुद्राच्या पाण्यात ते डुबकी घेत. समुद्राच्या पाण्यात, त्वचेत असणाऱ्या पाण्याचे प्रमाण समतोल राखण्याची, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची आणि मनाला प्रफुल्लित करण्याची क्षमता आहे. उन्हाळ्यात तर समुद्रस्नान हा एक उष्णतेपासून सुटका देणारा मौजेचा उपाय आहे.

त्वचा तजेलदार बनते

समुद्राच्या पाण्यात असलेल्या ‘मॅग्नेशियम’च्या उच्च प्रमाणामुळे त्वचेला (Skin) आर्द्रता लाभून त्वचा खुलते. मॅग्नेशियम त्वचेची जळजळ कमी करण्यासही मदत करते.

रक्ताभिसरण सुधारते

समुद्रात पोहण्यामुळे धमन्या आणि शिरांद्वारे, अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडे वाहण्यास मदत होते. आपल्या जीवनशैलीमुळे, प्रदूषणामुळे तसेच मानसिक तणावामुळे शरीरातील खनिजांना झालेल्या नुकसानीची भरपाई समुद्राच्या पाण्यात पोहल्यामुळे होते.

स्वास्थ्याचा लाभ

समुद्राच्या पाण्यात पोहण्याने आपसूकच मनाला एक अपरिमित आनंद लाभतो आणि एकूणच आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. सामान्य वेदनाच नव्हे तर दमा, संधिवात किंवा ब्रॉन्काइटिसच्या वेदनांवरदेखील समुद्रस्नान हा एक उतारा असतो. स्नायूंना आराम देण्यास आणि शांत झोप घेण्यास समुद्रातील समृद्ध मॅग्नेशियममुळे मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

आपली रोगप्रतिकार प्रणाली ही खनिज द्रव्य, सूक्ष्मजीव आणि अमिनो अ‍ॅसिडचे नैसर्गिक मिश्रण असते. समुद्राचे पाणी शरीरात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबिंब करणाऱ्या पदार्थांचे आणि प्रतिजैविकांचा प्रभाव वाढवू शकते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्तीला (Immunity) चालना मिळते. समुद्रावरील बाष्पामध्ये निगेटिव्ह चार्ज झालेले आयन असतात, जे फुफ्फुसात प्रवेश करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. समुद्रात पोहताना मोकळ्या झालेल्या रंध्रांमधून, त्वचा समुद्रातील खनिजे शोषून घेते त्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

‘खारें उदक न्हावप’ हे किती आरोग्यदायी आहे हे आमच्या पूर्व पिढ्यांना निश्चितच ठाऊक होते. त्यामुळे समुद्रस्नानाचा त्यांचा वार्षिक सोहळा अगदी नेमाने पार पडायचा. मात्र हा रिवाज हल्ली बराच कमी झाला आहे. नाहीतरी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरच्या पाण्यात प्रदूषणाचे प्रमाणही ‘घातक’ म्हणावे इतके वाढले आहे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालच सांगतो.

ग्रीक लोक समुद्राचे पाणी पूलमध्ये किंवा टबमध्ये भरूनही खाऱ्या पाण्याच्या स्नानाचा आनंद लुटायचे असे म्हणतात. कदाचित बदलत्या काळात ‘खारें उदक न्हावपाक’पण अशीच एखादी सोय उपलब्ध करून घेणे हाही एक उपाय होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT