Summer Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Skin Care: बदलत्या हवामानामुळे त्वचेवर खाज येत असेल तर 'या' गोष्टी आंघोळीच्या पाण्यात करा मिक्स

Summer Skin Care: तुमच्या त्वचेवर बदलत्या हवामानामुळे जर खाज येत असेल तर पुढीलप्रमाणे काळजी घेऊ शकता.

Puja Bonkile

summer skin care weather change how to avoid itching of skin home remedies

जसजसे हवामान बदलत आहे तसतसे शरीरावर अनेक बदल दिसू लागले आहेत. या ऋतूमध्ये अनेकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या सुरू होते. या समस्येसाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध असली तरी बाजारात उपलब्ध असलेल्या या उत्पादनांवर अनेकांचा विश्वास बसत नाही. अशा वेळी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हालाही जास्त पैसे खर्च न करता या समस्येपासून आराम मिळेल.

कडुलिंबाची पाने

तुम्ही रस्त्यावर आणि घराच्या सभोवताली कडुलिंबाचे मोठे झाड पाहिले असेलच. त्याची पाने अनेक गोष्टींसाठी खूप उपयुक्त आहेत. विशेषत: बदलत्या हवामानात खाज येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकू शकता.

असा करा वापर

कडुनिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने वापरण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा अर्क काढावा लागतो. आता तुम्ही हा अर्क आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसू लागेल. तसेच तुम्ही गरम पाण्यात ही पाने उकळून शकता. या पाण्याने आंघोळ केल्यास खाज कमी होऊ शकते.

व्हिनेगर

जर तुमच्या घरी ऍपल सायडर व्हिनेगर असेल तर तुम्हाला शरीरातील कोरडेपणापासून आराम मिळतो. यामध्ये आढळणारे घटक तुम्हाला काही दिवसात शरीरावर येणाऱ्या खाजेच्या समस्येपासून सुटका मिळेल.

अशा प्रकारे करा वापर

सफरचंद सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी तुम्हाला फक्त आंघोळीचे पाणी घ्यावे लागेल आणि त्यात सफरचंद सायडर व्हिनेगरचे 2 थेंब मिक्स करावे लागेल. नंतर ते चांगले मिक्स करा आणि या पाण्याने आंघोळ करा. त्वचेवर येणारी खाज कमी होईल.

अँटी-बॅक्टेरियल साबण

जर तुमच्याकडे अशा प्रकारचे काम करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्ही सोपा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही बाजारात मिळणारे अनेक प्रकारचे अँटी-बॅक्टेरियल साबण वापरू शकता. याने आंघोळ करूनही तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT