Benefits of Sugarcane Juice Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sugarcane Juice: आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी

उसाचा रस (Sugarcane Juice) कर्करोगाशी (Cancer) लढण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

भारत (India) हा ऊस उत्पादन घेण्यात जगातील सर्वात मोठा देश आहे. उसाचे प्रमुख उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू,आंध्र प्रदेशमध्ये होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस (Sugarcane Juice) शीत पेय (Cold drinks) म्हणून पिल्या जाते. उसाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी (health) लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे.

* शरीराची ऊर्जा वाढवतो

उसाचा रस (Sugarcane Juice) पिल्याने आपल्या शरीराचा थकवा दूर होर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून दूर ठेवतो.

* मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते

उसाच्या रसात (Sugarcane Juice) पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे कावीळ, मूत्रपिंडाशी संबंधित आजारावर उसाचा रस गुणकारी आहे. उसाच्या रसामुळे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यास मदत मिळते. तसेच उसाच्या रसामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते. यामुळे उसाच्या रसाचे (Sugarcane Juice) सेवन नक्की करावे.

* कर्करोगाशी लढण्यास मदत

उसाचा रस (Sugarcane Juice) कर्करोगाशी (Cancer) लढण्यास मदत करते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळेच शरीरात कर्करोगाशी लढण्यास मदत मिळते. तसेच ज्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग असेल त्यांच्यासाठी सुद्धा उसाचा रस (Sugarcane Juice) गुणकारी आहे.

* चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात

उसाचा रस पिल्याने (Sugarcane Juice) चेहऱ्यावरील (face) समस्यां दूर होण्यास मदत मिळते. यामध्ये ग्लायकोलिक, अल्फा-हायड्रॉक्सीसारख्या अॅसिड सिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरात पेशींची वाढ होते. तसेच त्वचेला एक्सफोलिएट करून त्वचेवरील पुरळ (rash) कमी करण्यासाठी मदत करते. तसेच ऊस खाल्ल्याने दात मजबूत राहून दात किडण्याची शक्यता कमी असते.

* पचनशक्ती चांगली राहते

उसाच्या रसात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपल्या पोटातील पीएचची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. तसेच आपल्या शरीराची पचनशक्ती चांगली ठेवल्यास मदत करते. उसाच्या रसामुळे पोटाच्या आजारांपासून बचाव होतो. यामुळे उसाचा रस (Sugarcane Juice) आरोग्यासाठी (health) लाभदायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT