Stomach Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stomach Pain: 'या' अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन्समुळे पोटदुखी अन् गॅसची समस्या वाढते, करा घरगुती उपाय

खाण्याच्या काही वाईट सवयींमुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. गॅस दूर करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

stomach pain bad food combination cause of stomach pain gas try home remedies

तुमच्या काही खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटदुखी, गॅस आणि सुज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आजकाल अनेकांना गॅसचा त्रास होतो. अवेळी काहीही पदार्थ खाल्ल्याने गॅसची समस्या उद्भवते. असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ल्याने पोटात तीव्र गॅस तयार होतो. अशावेळी ते खाणे टाळावे. जर गॅसची समस्या असेल तर ते टाळण्यासाठी लोक औषधांची मदत घेतात. पण तुम्ही गॅसची समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करू शकता.

दुध आणि ब्रेड

अनेक लोक दुधासोबत ब्रेड खातात. हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक आहे. कारण यामुळे पोटांसंबधित समस्या जसे की गॅस आणि पोट दुखीची समस्या वाढू शकते.

पास्ता, नुडल्स आणि फळं


ब्रेड, तृणधान्ये, नूडल्स, पास्ता यासारखे पिष्टमय पदार्थ असलेली फळे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे फूड कॉम्बिनेशन खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. फळ लवकर पचतात. त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

  • घरगुती उपाय

पोटातील गॅसची समस्या कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायदेशीर आहे. जिरे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं पावडर टाकून ते उकळून गाळून प्यावे.

ओव्याचे पाणी प्यायल्याने गॅसपासूनही आराम मिळतो. यासाठी पाण्यात ओवा टाकून उकळा. फक्त ओवा चघळणे देखील फायदेशीर आहे.

पोटात गॅस तयार होत असल्यास आलं आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. दोन्ही एकत्र प्यायल्याने गॅसपासून आराम मिळतो.

याशिवाय एका जागी बसल्यानेही गॅस होऊ शकतो. अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारणे चांगले. जेवल्यानंतर थोडं चालायला हवं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT