Spinach Juice

 
लाइफस्टाइल

'या' 6 आजारांवर पालकाचा रस खूप फायदेशीर, हिवाळ्यातच करा प्यायला सुरुवात

पालकामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. पालकामध्ये कॅरोटेन, अमिनो अॅसिड, लोह, आयोडीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के, ई..

दैनिक गोमन्तक

पालकाच्या ज्यूसचे फायदे: पालकाच्या गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पालकाचे (Spinach) सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पालक भाजी म्हणून खात असो किंवा पालकाचा रस प्यायला असो, दोन्ही बाबतीत पालक आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतो. पालक त्याच्या चवीमुळे कमी आवडतो, परंतु यात पोषक तत्वांचा खजिना आहे आणि बऱ्याच समस्यांचे निराकरण करण्यात प्रभावी आहे. विशेषतः हिवाळ्यात पालकाच्या रसाचा शरीराला खूप फायदा होतो. आपली प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासोबतच त्वचा, केसांच्या समस्यांसह अनेक आजारांशी लढण्यास मदत करते.

पालकामध्ये भरपूर पोषक तत्वे (Nutrients) असतात. पालकामध्ये कॅरोटेन, अमिनो अॅसिड, लोह, आयोडीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के, ई आणि बी कॉम्प्लेक्स देखील भरपूर असतात. पालकाचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराची पीएच पातळी संतुलित राहते. पालकामध्ये प्रोटीन आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असते.

1. अॅनिमिया - शरीरात रक्त कमी झाल्यामुळे अॅनिमियाची लक्षणे दिसून येतात. पालकामध्ये भरपूर लोह आढळते. याच्या मदतीने शरीरात लाल रक्तपेशी वेगाने तयार होतात. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता वेगाने दूर होते.

2. संधिवात - पालक क्षारयुक्त आहे. यामुळेच जेव्हा संधिवात जाणवत असेल तेव्हा पालकाचे सेवन केल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

3. पोटाच्या समस्या - पोटाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी पालक खाणे खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये भरपूर फायबर आढळते. अल्सर, कमकुवत पचनसंस्था आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

4. ऑस्टिओपोरोसिस - ऑस्टियोपोरोसिस या घातक रोगाशी लढण्यासाठी पालक देखील प्रभावी आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन के आढळते. याच्या मदतीने कॅल्शियम हाडांच्या आत घट्ट राहण्यास मदत होते. त्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत होतात.

5. त्वचा – पालकाचे नियमित सेवन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पालकाचा रस नियमितपणे प्यायल्याने त्वचेची हरवलेली चमक परत येते आणि त्यात मुलायमपणा येतो. कालांतराने सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. महागडी अँटी-एजिंग क्रीम्स किंवा स्किन टॉनिक वापरण्याऐवजी रोज एक ग्लास पालकाचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.

6. केस - त्वचेप्रमाणेच पालकाचा रस केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केस पातळ होणे किंवा टाळूला खाज सुटणे अशा वेळी पालकाच्या रसाचा खूप फायदा होतो. पालकामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात असते. केसांची वाढ वाढवण्यासोबतच ते मजबूत होण्यासही मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT