Skin Scrubbing:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Scrubbing: चेहऱ्यावर स्क्रब करतांना या 5 गोष्टींची घ्यावी काळजी

त्वचेवरील घाण कमी करण्यासाठी तुम्ही स्क्रब करत असाल तर या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Skin Care Tips: चेहऱ्यावर चमक दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर केला जातो. अनेक महिला स्क्रबचा वापर करतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी स्क्रबचा वापर केला जातो.

अनेक महिला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी स्क्रब करतात. जर तुम्ही स्क्रबने चेहरा जास्त घासत असाल त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर स्क्रब करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

  • ऑइली स्किन

तेलकट त्वचेवर असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी स्क्रब करणे फायेदशीर असते. पण दर दोन-तीन दिवसांनी स्क्रब केल्यास त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे तेल ग्रंथी आणखी तेल तयार करू लागतात. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि बारिक फोड येतात. म्हणूनच ऑइली आणि संवेदनशील त्वचेवर स्क्रब हलक्या हाताने करावे.

  • पोर्सचा आकार वाढतो

जर तुम्ही वारंवार स्क्रब केले तर त्वचेच्या बारीक छिद्रांचा आकार वाढतो. त्यामुळे त्वचा खराब दिसू लागते. स्क्रब खूप जोरात केल्याने काही वेळा स्क्रबचे पार्टिकल टोचतात.यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

  • त्वचा घासु नका

जर तुम्ही स्क्रब चेहऱ्यावर जास्त वेळ घासत असाल तर असे करू नका. कारण असे केल्याने त्वचेच्या वरचा संरक्षक थर खराब होतो. त्यामुळे टॅनिंग, रॅशेस, अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान आणि सनबर्नचा धोका वाढतो.

  • ड्राय स्किन

जर त्वचा खूप कोरडी असेल आणि ड्राय पॅचेस असल्यास तर त्वचेवर स्क्रब करू नये. कोरड्या पडलेल्या त्वचेवर स्क्रब केल्याने त्वचा आणखी संवेदनशील बनते. त्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, जळजळ होणे यासारख्या समस्या सुरू होतात.यामुळे स्क्रब करतांंना वरील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT