Holi Festival  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2022: त्वचेची घ्या 'अशी' काळजी, अन्यथा होईल वाईट परिणाम

चेहऱ्यावरील होळीचा रंग काढताना काळजी घ्यावी.

दैनिक गोमन्तक

रंगांचा उत्सव म्हणजे होळी. या दिवशी राग-द्वेष विसरून सर्वजण एकमेकांना रंग लावतात. आनंद आणि रंगांनी भरलेला हा सण सर्वत्र साजरा केला जातो. पण होळी (Holi) खेळताना हर्बल रंगाचा वापर केला जातो. पण अनेक लोक रासायनिक रंगांचा वापर करतात. यामुळे हा रंग त्वचेवरून काढताना काळजी घ्यावी.

त्वचेवरील रंग काढताना या चुका टाळा

* त्वचेला घासू नका

होळीचा (Holi) रंग चेहऱ्यावरील आणि शरीराच्या इतर भागांवरील रंग काढण्यासाठी अनेक लोक त्वचेला जोरात घासू लागतात. यामुळे रंग लवकर निघतो असे त्यांना वाटते. पण असे केल्याने तुमची त्वचा कोरडी पडू शकते किंवा त्वचेला हआणि पोहोचू शकते. यामुळे रंग काढताना त्वचा जास्त घासू नये.

* फेशियल करणे टाळा

रंग खेळल्यानंतर किमान आठवडाभर फेशियल, ब्लिच करणे टाळावे. तसेच हेयर कलरचा (Hair Color) वापर देखील टाळावा. असे केल्यास केमिकल्समुळे त्वचा (Skin) घरब होऊ शकते.

* लिंबुचा वापर टाळावा

थेट लिंबाचा वापर त्वचेवर होऊ देवू नका. होळीचे रंग स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस थेट त्वचेवर लावू नये. यामुळे त्वचा जळजळ किंवा पिंपल्स येवू शकतात.

या गोष्टी ठेवा लक्षात

* रंग खेळण्यापूर्वी केसांना आणि त्वचेला तेल लावावे. यामुळे त्वचेचे रंगांपासून रक्षण होईल. तसेकह पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे.

* ओठांची काळजी घेण्यासाठी त्यावर चांगला लिप बाम लावावा.

* होळी खेळताना रंग डोळ्यात किंवा तोंडात गेल्यास लगेच स्वच्छ पाण्याने धुवावे.

* तुम्हाला जर चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स असतील तर ते होळी खेळताना काढून टाकावे.

* होळी खेळताना केस मोकळे ठेवू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: KKR चा मास्टरस्ट्रोक! एका विजयाने विस्कटली बाकी संघांची रणनीती; असे आहे 'प्लेऑफ'चे नवे समीकरण

Horoscope: संडे ठरणार लकी! 'या' राशीच्या लोकांवर होणार पैशांचा आणि सन्मानाचा वर्षाव, प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

SCROLL FOR NEXT