Besan For Oily Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Besan For Oily Skin : तेलकट त्वचेवर बेसन आहे रामबाण उपाय; 'या' पद्धतीने वापरा

Besan For Oily Skin : बेसनचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी खूप आधीपासून केला जातो.

दैनिक गोमन्तक

Besan For Oily Skin : बेसनचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी खूप आधीपासून केला जातो. बेसनाचे पीठ थोडेसे खडबडीत असते, त्यामुळे ते त्वचेत खोलवर जाऊन ते त्वचा स्वच्छ करते. याशिवाय बेसनामध्ये असलेल्या पोषकतत्त्वांचेही त्वचेला अनेक फायदे मिळतात.

दुसरीकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्वचेचे इन्फेक्शन होत असेल तर साबण किंवा फेसवॉशऐवजी बेसनाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. त्याचबरोबर पावसाळ्यात त्वचा खूप तेलकट होते. अशा स्थितीत त्वचा स्वच्छ करण्यासाठी बेसनाच्या पीठाने त्वचा तेलकट होण्यापासून वाचवता येते.

(Besan For Oily Skin)

बेसन चेहऱ्यावर लावण्याचे फायदे :

पिंपल्सची तक्रार दूर होते :

बेसन चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. बेसनमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. बेसन चेहऱ्यावर लावल्याने त्वचा आतून स्वच्छ होते. त्यामुळे पिंपल्सची समस्या येत नाही.

मृत पेशी काढून टाकते :

बेसन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. बेसनामध्ये असलेले एक्सफोलिएटिंग घटक मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर बेसन चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर

बेसनाचे पीठ त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकून ती स्वच्छ करते. बेसन नैसर्गिक पद्धतीने त्वचा निरोगी बनवण्यास मदत करते. बेसन दिवसातून केव्हाही लावता येते. बेसन लावल्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT