Side Effects Of Eating Peanuts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: अति शेंगदाणे खाणे कितपत योग्य? होऊ शकतात 'या' समस्या

आपल्यापैकी शेंगदाणे खाण्याचे खूपजण शौकिन आहेत.

Kavya Powar

Side Effects Of Eating Peanuts: आपल्यापैकी शेंगदाणे खाण्याचे खूपजण शौकिन आहेत. काही लोक असे असतात की जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते भाजलेले शेंगदाणे किंवा तळलेले शेंगदाणे खातात. असे काही लोक आहेत ज्यांची प्रोटीनची कमतरता शेंगदाण्याने पूर्ण होते.

कारण, त्यांना कोणतेही महागडे प्रोटीन परवडत नाही. परंतु अशा लोकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते. जास्त शेंगदाणे खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे देखील जाणून घ्या.

शेंगदाणे हा प्रथिने आणि फायबरचा खजिना आहे. पण शेंगदाणे जास्त खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होतात.

पोटाच्या समस्या

शेंगदाण्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते. याशिवाय पोट फुगणे आणि जुलाबाची समस्या देखील होऊ शकते. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर शेंगदाणे कमी प्रमाणात खाणे चांगले.

वजन वाढू शकते

शेंगदाणे स्वस्त असल्याने सर्वांना सहज उपलब्ध होतात. यामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात. परंतु, प्रथिनेयुक्त आहार मानून ते भरपूर खाण्याची चूक करू नका. कारण, शेंगदाण्यातही भरपूर फॅट असते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

पोषक तत्वांची कमतरता

शेंगदाणे तुम्हाला भरपूर पोषण देते. पण यामुळे काही पोषक तत्वांची कमतरता देखील असू शकते. शेंगदाण्यामध्ये असलेले फॉस्फरस फायटेटच्या स्वरूपात साठवले जाते. या फायटेटमुळे कॅल्शियम, झिंक, मॅंगनीज किंवा लोह शरीरात शोषले जात नाही. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

ऍलर्जी

काही लोकांना शेंगदाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍलर्जी होऊ शकतात. काही लोकांना यामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे खाज सुटणे किंवा घसा किंवा तोंडात खवखवणे अशी तक्रार होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT