Ice Cream in Summer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ice Cream in Summer: उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताना येते मजा; पण याचे तोटे तुम्हाला माहितीये का? नाही तर हे एकदा वाचाच

काही लोक जास्त थंड होण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक आइस्क्रीम खातात

दैनिक गोमन्तक

Ice Cream in Summer: उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागले आहे. जेव्हा खूप गरम होते तेव्हा शरीर तापू लागते. शरीराचे तापमान वाढू लागते. थंड राहण्यासाठी लोक थंड पाणी पितात किंवा आईस्क्रीम खातात. लोकांना थंड पेय प्यायलाही आवडते. दुसरीकडे, काही लोक जास्त थंड होण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक आइस्क्रीम खातात. जर तुम्ही उन्हाळ्यात इतकं आईस्क्रीम खात असाल किंवा ते खाण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या.

  • चरबी वाढते

बर्‍याच अभ्यासातून हे समोर आले आहे की आइस्क्रीममध्ये भरपूर साखर आणि कॅलरीज असतात. हे शरीरातील चरबी लवकर वाढवण्याचे काम करते. यातून लठ्ठपणा येतो, तसेच इतर अनेक आजारांचा धोका असतो. रोज 3 ते 4 आइस्क्रीम खाल्ल्यास शरीराला त्यातून 1000 पेक्षा जास्त कॅलरीज मिळतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे खूप त्रासदायक आहे.

  • हृदयरोगाचा धोका

आइस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते. यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यातूनच लठ्ठपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका असतो. जर कोणी आधीच उच्च रक्तदाबाचा रुग्ण असेल तर त्याची समस्या अनेक पटींनी वाढू शकते.

  • मेंदूवर थेट परिणाम

आइस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि साखर जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे मेंदूच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते. किमान आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करा.

  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक

ज्या लोकांची मधुमेहाची पातळी जास्त आहे किंवा त्यांना मधुमेह आहे. त्यांनी आईस्क्रीम खाऊ नये. त्यांना याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले; व्हेनेझुएलाच्या मारिया मचादो यांना मिळाला नोबेल शांतता पुरस्कार

Yashasvi Jaiswal Century: शतक पूर्ण... सेलिब्रेशन व्हायरल! यशस्वी जयस्वालने 'ती' फ्लायिंग किस कोणासाठी दिली? Watch Video

IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

Finasteride Side Effects: टक्कल उपचाराच्या नादात 'मृत्यू'ला आमंत्रण, 'हे' औषध ठरू शकतं जीवघेणं! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य

SCROLL FOR NEXT