Shrawan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shrawan 2022: श्रावणात 'ही' 5 रोपे लावल्यास घरात होणार लक्ष्मीची कृपा

Shrawan 2022: श्रावण महिन्यात कोणती झाडे लावल्याने आपले नशीब चमकू शकते हे जाणुन घेउया.

दैनिक गोमन्तक

श्रावण महिना 14 जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाची आपल्या भक्तांवर विशेष कृपा असते. ज्योतिषी सांगतात की, श्रावण महिना असा महिना आहे ज्यामध्ये काही रोपे लावल्याने माणसाचे नशीब चमकु शकते. जाणून घेऊया श्रावण (Shrawan) महिनामध्ये कोणती झाडे लावने ठरू शकते फायदेशीर. (Shrawan 2022 plants news)

* बेलाच्या पानांचे रोप

श्रावण महिन्यात भोलेनाथांचे भक्त शिवलिंगाला बेलची पाने अर्पण करतात. बेलची पाने भगवान शंकराला अतिशय प्रिय आहेत. वास्तूनुसार घरात या रोपाची लागवड केल्याने वास्तुदोष दूर होतात. ज्या घरात बेलच्या पानांचे रोप असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

* तुळशीचे रोप

श्रावण महिन्यात (Shrawan Month) घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे देखील शुभ मानले जाते. घराच्या सुख-समृद्धीसाठी तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी.

* केळीचे झाड

एकादशीला घराच्या मागे केळीचे झाड लावणे शुभ मानले जाते. ते कधीही घरासमोर लाउ नये. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी केळीच्या रोपाला नियमित पाणी घालावे.

* शमीचे रोप

श्रावण महिन्यात शनिवारी शमीचे रोप लावने शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला रेप लावावे.

* पिंपळाचे रोप

तुम्ही श्रावण महिन्यात पिंपळाचे रोप देखील लावू शकता. रोज पाणी देऊन प्रदक्षिणा घातल्याने मुलांशी संबंधित दोष किंवा समस्या नष्ट होतात. शनिवारी संध्याकाळी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने अपघात होण्याची शक्यता कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

SCROLL FOR NEXT