Shravan 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shravan 2023: श्रावणात घरात महादेवाचा फोटो लावताय, 'ही' चूक टाळा

तुम्ही घरात महादेवाचा फोटो लावत असाल तर या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Shravan Month 2023: यंदा श्रावण महिना हा दोन महिने असणार आहे. 17 जुलैपासून अधिक श्रावण सुरू झाला असून ऑगस्टमध्ये श्रावण सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते. यामुळे घरात शंकराचा फोटो लावतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • ध्यानस्थ असलेला फोटो लावावा

घरात सुखशांती हवी असेल तर महादेवाचा ध्यानस्थ असलेला फोटो लावणे शुभ मानले जाते. असा फोटो लावल्याने घरातील वातावरण आनंदी राहते. तसेच घरात सकारात्मक वातावरण देखील राहते. घरात नकारात्मक शक्ती प्रवेशही करू शकत नाही.

  • 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक फोटो घरात लावावा

देशभरात 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. यापैकी एक फोटो घरात लावणे शुभ मानले जाते. असे महादेवाचे फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते.घरातील सदस्यांवर कायम कृपादृष्टी टिकून राहते. तसेच घर हसत-खेळत राहते.

  • कोणत्या दिशेला लावाव फोटो

महादेवाचा फोटो लावताना दिशेला देखील महत्व आहे. महादेवाचा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. महादेवांचे प्रिय स्थान कैलास पर्वत उत्तरेकडे आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार महादेवाचा फोटो उत्तर दिशेला लावावे.

  • महादेवाचे असे फोटो घरात ठेऊ नये

घरात महादेवांचा तुटलेला फोटो चुकूनही ठेऊ नये. कारण असा फोटो ठेवणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते. तसेच महादेवाची तुटलेली पिंड असल्यास हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे असा फोटो असल्यास नदीच्या पात्रात सोजून द्यावे.

तसेच महादेव तांडव करत असतांनाचा फोटो लाऊ नये. कारण या फोटोमध्ये या रूपात महादेव प्रसन्न नसून ते उग्र रूपात पाहायला मिळतात. हा फोटो घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकते त्यामुळे असे फोटो घरात ठेऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT