Face Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shaving Tips For Women: पहिल्यांदाच चेहरावर शेव्हिंग करत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Puja Bonkile

Shaving Tips For Women

अनेक महिला चेहऱ्यावर नको असलेले केस लपवण्यासाठी ब्लीच किंवा शेव्हिंग करतात. पण शेव्हिंग करताना खुप काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही पहिल्यांदाच रेझर वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • चेहरा स्वच्छ करावा

शेव्हिंग करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ करावा. कारण अनेक वेळा चेहरा तेलकट राहतो. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी फेस वॉश वापरा.

  • पुरळ असल्यास करू नका शेव्हिंग

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा इतर समस्या असतील तर तुमचा चेहऱ्यावर शेव्हिंग करू नका. अन्यथा तुम्हाला त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे पुरळ कमी झाल्यावर शेव्हिंग करावी.

  • शार्प रेझर टाळा

शेव्हिंग करताना योग्य रेझर वापरणे गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित शेव्ह करू शकाल. तसेच तुम्हाला चांगले शेव्हिंग जेल किंवा क्रीम वापरावे लागेल. त्यामुळे जास्त फोम तयार होतो. मग हलक्या हातांनी चेहरा शेव्ह करा. रेझर जास्त वेगाने वापरू नका अन्यथा कट होण्याचा धोका जास्त असू शकतो.

  • पुढील गोष्टी ठेवाव्या लक्षात

चेहऱ्यावर जास्त दबाव टाकून रेझर वापरू नका.

रेझर स्वच्छ करा आणि योग्य जागी ठेवावे.

शेव्हिंग केल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे.

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम असतील तर ते अजिबात वापरू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT