Shani Sade Sati Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shani Sade Sati: 'या' राशीच्या लोकांना होत नाही शनिच्या साडेसातीचा त्रास; तुम्हीही यापैकी एक आहात का?

आपल्यापैकी अनेकांना शनिच्या साडेसातीचा त्रास असतो. यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठमोठे बदल होत असतात

Kavya Powar

Shani Sade Sati: आपल्यापैकी अनेकांना शनिच्या साडेसातीचा त्रास असतो. यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठमोठे बदल होत असतात. पण काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असते.

जर एखाद्याच्या कुंडलीतील शुभ घरामध्ये शनि असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख भरून येते. शास्त्रानुसार शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो कारण शनीची हालचाल अतिशय मंद असते.

ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती असते त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. याउलट ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान असते त्या व्यक्तीचे भाग्य खुलते.

या व्यतिरिक्त, सर्व 12 राशींमध्ये, काही राशी आहेत ज्यावर शनीच्या साडेसातीचा प्रभाव खूपच कमी आहे कारण शनिदेव या राशींवर खूप कृपा करतात. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

या तीन राशींवर शनिदेवाची असते कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व राशींवर ग्रहांचे स्वामित्व आहे, त्यापैकी शनिदेवाकडे दोन राशींचे स्वामित्व आहे. मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह शनि आहे.

या कारणास्तव या राशींवर जेव्हा जेव्हा शनिची साडेसाती असते, तेव्हा त्याचा त्यांच्यावर फारसा प्रभाव पडत नाही. याशिवाय तूळ राशीवर शनिदेवाची नेहमी कृपा करतो. या कारणामुळे तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.

या तिन्ही राशींवर शनीच्या कृपेमुळे अशुभ सावली पडत नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात फारसे अपयश येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT