Avoid food wastage Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Avoid food wastage: 'या' पद्धती वापरा आणि अन्नाची नासाडी टाळा

'अन्नाची बचत' ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सध्या लग्न-सराईचा आणि सण उत्सवाचा हंगाम सुरु आहे. अशाप्रसंगी भरपूर प्रमाणात अन्न शिजवले जाते, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात तयार केले जातात. कधी आग्रहाखातर तर कधी गप्पा-गोष्टीमध्ये आपण ताटात गरजेपेक्षा जास्तच वाढून घेतो. पोटाची भूक भागते, पण ताटातील अन्न काही संपत नाही. ऊष्टे म्हणून ते कोणाला दिलेही जात नाही आणि नंतर त्याची रवानगी थेट कचर्‍यात होते, अशावेळी आधीच वाढून घेताना जेवढे संपवता येईल तेवढेच वाढून घ्यावं.

कधी कधी तयार केलेले पदार्थ संपतात पण बऱ्याचवेळा जेवण उरते. शेवटी हे उरलेले अन्न कचरा कुंडीत जाऊन पडते. यातून अन्नाची नासाडी होतेच त्याचबरोबर कचर्‍यात टाकलेले अन्न जेव्हा सडते तेव्हा त्यातून अनेक हानिकारक वायु बाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणावर वातावरण प्रदूषित करतात, ज्याचा त्रास आपल्यालाच होतो.

जगात अजूनही गरीब देश आहेत, जिथल्या लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. ती मोठ्या कष्टाने जगतात. भूकबळींची आकडेवारी, कुपोषण आणि पर्यावरणातील बदल यावरूनच ‘ अन्न बचत’ किती आवश्यक आहे हे सहज समजेल. तसेच अन्नाचे कंपोस्ट़िंग करणं हाही चांगला उपाय आहे. अन्नाचं कंपोस्ट़िंग करून अन्नातील पोषण तत्व जमिनीत रूजवा. याच मातीतून स्वतःच्या भाज्या आणि फळे पिकवा. कारण अन्नाची बचत ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी खालील उपाय करता येतील...

हॉटेलमध्ये गरजेपुरतेच पदार्थ मागावा- हॉटेलमध्ये गेल्यावर उगाचच भरपूर पदार्थ मागवून ठेवू नका. सुरुवातीला थोडेसेच मागवा. अजून लागल तरच ऑर्डर द्या. भरपूर पदार्थ मागवल्यामुळे अन्न आणि पैसे दोन्हीही वाया जातात. खाणारे सदस्य, त्यांची भूक लक्षात घेऊनच पदार्थ मागावा.

विचारपूर्वक खरेदी करा- बरेचदा आपण बाहेर असताना आवडल म्हणून खाण्याचं सामान किंवा भाजी घेऊन टाकतो नंतर लक्षात येतं की हे आधी फ्रीज मध्ये पडलेल होतं आणि सामान तर वाया जातेच वर पैसे सुद्धा जातात.

अन्नाची साठवणूक योग्य प्रकारे करा- बाजारातून आणलेले अन्नपदार्थ आणि भाज्या नीट साठवा जेणेकरून दुर्लक्ष झाल्याने ते खारट होणार नाहीत. उरलेले अन्नपदार्थ बाहेर न ठेवता नीट झाकून फ्रीजमध्ये ठेवा, फळभाज्या नीट धुवून साठवा आणि पालेभाज्या निवडूनच साठवा जेव्हा वापरायच्या असतील तेव्हा आयत्यावेळी धुवा.

बेताचा स्वयंपाक- हल्ली सगळेच आपाआपल्या कामात व्यस्त असल्याने आपल्याकडे कोणी येत नाही आणि येणार असले की आगाऊ सूचना देऊन येतात. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणाचा आपल्याला अंदाज असतोच, त्यानुसार स्वयंपाक करा किंवा बाहेरून ऑर्डर करा. जोडीला फळं वगैरे ठेवा म्हणजे चुकून कमी पडल्यास उपाशी न राहता वेळ निभावता येईल आणि काही वायाही जाणार नाही.

टिकणार्‍या पदार्थांची बेगमी - आपल्या रोजच्या आहारात आपण ताज्या पदार्थांना आपल्या जेवणात पहिलं स्थान देतो. मात्र आपल्याला असे बरेचसे पारंपरिक पदार्थ लाभलेले आहेत, ज्याची बेगमी करता येऊ शकते. जसे पोहयांचा चिवडा, मक्याचा आणि कुरमुरयांचा चिवडा, लाडू..हे पदार्थ वाया जाण्याची भीतीही नसते. कारण ह्याला जरी एक्स्पयरी असली तरी चविष्ट असल्याने हे पदार्थ सहसा वाया जाण्यासाठि शिल्लकच राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT