Sabja Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sabja Benefits: पचनाला गुणकारी सब्जाच्या बिया... वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व पोषक तत्वांनी सब्जा समृद्ध आहे

दैनिक गोमन्तक

Sabja Benefits: वातावरणातील वाढत्या तापमानाचा आपल्या केस, त्वचा, पचन यावर परिणाम होतो. पोटाशी संबंधित बहुतेक समस्याही यामुळे वाढतात. पोटात उष्णता वाढते तेव्हा गॅस, छातीत जळजळ, अ‍ॅसिडीटी अशा अनेक समस्या सुरू होतात. या सर्व समस्यांवर सब्जा गुणकारी आहे.

होय, हे एक थंड करणारे घटक आहे, जे पोट थंड ठेवते. आपल्या सर्व आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे.

सब्जाच्या बिया का फायदेशीर आहेत?

1. सब्जाच्या बियांमध्ये मर्यादित प्रमाणात कॅलरीज आढळतात. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात. याशिवाय त्यात आवश्यक ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

2. सब्जा पचनासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण पुरेसे असते आणि फायबर पचनासाठी खूप महत्वाचे असते. यातील गुणधर्म पोटाला थंडावा देतात आणि अपचन रोखतात.

3. सब्जामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. अशा स्थितीत याचे सेवन केल्यास जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे आपण भुकेवर नियंत्रण ठेवू शकता. यासोबत तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेत नाही.

4. कमी पाणी पिण्यामुळे किंवा संसर्गामुळे अनेकदा UTI ची समस्या उद्भवते, अशावेळी सब्जाचे पाणी नियमित सेवन केल्याने तुम्ही हायड्रेटेड राहता आणि UTI ची समस्या टळते.

5. जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल. जर त्यावर टॅनिंग आले असेल, तर तुम्ही प्रभावित भागावर सब्जाच्या बिया लावू शकता. याशिवाय तुम्ही याचे सेवन केल्यास ते कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. त्यामुळे तुमची त्वचा घट्ट होते. तसेच त्वचेच्या नवीन पेशी येण्यास मदत होते.

6. सब्जा बियाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. सब्जा बियाण्यांमुळे साखर नियंत्रणात राहते.

7. सब्जा खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय केसांना सुंदर ठेवण्यासही ते मदत करू शकते, कारण त्यात प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT