Royal Palace of Ravaraje Deshprabhu in Pernem Dainik Gomantak
लाइफस्टाइल

रावराजे देशप्रभूंचा रॉयल राजवाडा

अतिथी वाडा-गेस्ट हाऊस बांधण्यासाठी तीन वर्षे लागली होती. 1905 साली या वाड्यांना इटालियन टाईल्स व मार्बल बसवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

यातल्या प्रमुख वाड्यात समृद्ध असे वाचनालय व वस्तुसंग्रहालय आहे. त्यात ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्यात आले आहेत. वाचनालयात 1510 पासूनचे ग्रंथ आहेत. यात वाचस्पतीसारख्या दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. अनेक कोश, पोथ्या, धार्मिक ग्रंथांचाही यात समावेश आहे. बापूसाहेब म्हणजे आत्माराम देशप्रभू यानी वामन शास्त्री इस्लामपूरकरांचा ग्रंथसंग्रह विकत घेऊन व त्यात भर टाकत, ग्रंथालय स्थापन केले होते. त्यानंतर वासुदेव देशप्रभू यांनी मुंबई पुण्यातून दुर्मिळ ग्रंथ आणून ग्रंथालय वाढविले.

ग्रंथालयाला जोडूनच सुंदर अशा वस्तुसंग्रहालयात हजारो वर्षापासूनच्या भारतीय परंपरा, इतिहास यांच्या विविध टप्प्यांचे दर्शन घडते. यात नाणी संग्रह आहे, वस्तुसंग्रहात पालख्या, पेशवाईतील समई, दाण्डपट्टे, पेहराव, कारागिरी केलेल्या लाकडाच्या वस्तू , खास सामारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या शाही तलवारी इत्यादी सर्व वस्तूंचा समावेश आहे.

देशप्रभूंना मिळालेल्या व्हायकाउंट पदवी विषयी वारंवार चर्चा होत असते. ही पदवी आत्माराम वासुदेव देशप्रभू याना 1882 साली पोर्तुगीजांनी बहाल केली. ही पदवी मिळालेल्या कुटुंबाना पोर्तुगीज राज्यकर्त्यांशी थेट संपर्क साधता येई. त्याना ही पदवी देण्यामागे तसेच कारण होते. आत्माराम देशप्रभू यांनी त्या काळी अनेक समाजोपयोगी कामे केली. पाठशाला विस्तारली, अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या, महिला शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. गोव्यात पोर्तुगीज शिक्षणाची सक्ती असल्याने मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सोय व्हावी म्हणून कोल्हापूर संस्थानात महाविद्यालये सुरू केली.

अनेक शिष्यवृत्त्याही सुरू केल्या. त्यांच्याकडे 1200 घोडेदळाचे लष्करही होते. 1890 साली जेव्हा गोव्यात भीषण दुष्काळ पडला त्यावेळी पोर्तुगीज सरकारने त्याना गोव्याचा सांभाळ करण्याची विनंती केली. ती मान्य करून व्हायकाउंटने वर्षभर गोव्याचा सांभाळ केला. व्हायकाउंट पदवी पूर्वी आत्माराम यांचे वडील वासुदेव रघुनाथ देशप्रभू याना बेरॉन हा सन्मानही 1870 साली देण्यात आला होता. वाड्यात वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात.

श्रावण मासातील पाचव्या दिवशी नागपंचमी उत्सव राजवाड्यात मोठ्या थाटात साजरी केली जाते. नागाच्या प्रचलित मातीची प्रतिमा पूजली जाते. त्याच दिवशी घरच्या श्री दत्त मंदिरात पाच ब्राह्मणांद्वारे महारुद्र केला जातो. हा महारुद्र सुमारे पाच दिवस चालतो. जन्माष्टमीचा उत्सवही राजवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

वाड्यात साजरा होणाऱ्या सणांपैकी चतुर्थीचा सण सर्वात मोठा असतो. ३७ किलो माती वापरून गणपती रक्तरंजित रंगाचा पूजला जातो. नागपंचमीच्या दिवशी कुंभार राजवाड्यात येऊन गणपती तयार करायला सुरुवात करतो. गणपतीचे दागिने कुंभार बनवतो. मात्र त्याला सोनेरी रंग सोनार चढवतो. राजवाड्यातील गणपती शेंदुरी रंगाचा असतो. दोन्ही बाजूला दोन सिंह असलेला गणपती हिरव्या रंगाचे पितांबर नेसलेला व पिवळा शेला पांघरलेला असतो. राजवाड्यातील गणपती तीन दिवसांचा असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT