Valentine's Day Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Romantic Places For V-Day Celebration: कपल्सला खुणावणाऱ्या 'या' 5 रोमँटीक ठिकाणी भेट देऊन साजरा करा व्हलेंटाईन

तुम्ही व्हॅलेंटाइन डेनिमित्त फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही खास ठिकाणांना बेट देऊ शकता.

Puja Bonkile

Romantic Places For V-Day Celebration: व्हॅलेंटाईन डे हा एक प्रेमीयुगलासाठी खास दिवस असतो. जो दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रिय व्यक्ती, मित्र किंवा जोडीदारासमोर त्यांचे प्रेम व्यक्त करतात.

जरी व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जात असला तरीही, त्याचा उद्देश नेहमीच एकच असतो. प्रेम आणि भक्तीची भावना अनुभवणे आणि आपल्या प्रियजनांना विशेष वाटते.

या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला स्पेशल फील करायचं असेल तर तुम्ही त्यांना खास ट्रिपला घेऊन जाऊ शकता. भारतात असे अनेक ठिकाण आहेत जेथे तुम्ही भेट देऊ शकता.

गोवा

तुम्ही व्हॅलेंटाइन डे ला जोडीदारासोबत गोव्याला फिरायला जाऊ शकता. प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी गोवा हे एक आहे. गोव्यात बीच, सी-फुट, नाइट लाइफ, म्युझिक, यासारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. गोव्यात दोन ते तीन दिवस व्हॅलेंटाइन डे आनंदात साजरा करू शकता.

शिमला

तुम्ही दिल्लीजवळ राहत असाल तर तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी शिमला हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील हवामान वर्षभर रोमँटिक असते. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये तिथला नजारा पाहण्यासारखा असतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दोन ते तीन दिवसांसाठी शिमल्याला जाऊ शकता.

मसुरी

पहाडांची राणी म्हणून ओळखले जाणारे मसुरी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. जर तुमच्या जोडीदाराला डोंगराळ भागात फिरायला आवडत असेल तर त्याला या व्हॅलेंटाईन डेला मसुरीला घेऊन जा. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल.

आग्रा

आग्रामधील ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ताजमहालला भेट देण्यासाठी जाऊ शकता. ताजमहाल व्यतिरिक्त आग्रामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

उटी

फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी झाली असली तरी, डोंगरावर तुम्हांला बऱ्यापैकी थंडी पाहायला मिळेल. यामुळे तुम्ही हिवाळ्यात तुमच्या जोडीदारासोबत उटीला भेट देऊ शकता.

नैनिताल

लोक अनेकदा नैनितालला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातात. यंदा व्हॅलेंटाइन डेला तुमच्या जोडीदारासोबत बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. यामुळे तुमच्यातील प्रेमही वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT