Weight Loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

..असा शिजवा तांदूळ, वजन कमी करण्याचा 'हा' सोपा मार्ग

कॅलरीज 60 टक्क्यांनी कमी होतील कमी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील ही रेसिपी प्रभावी

दैनिक गोमन्तक

कमी कॅलरीजचे सेवन हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. पण असे करणे काही वेळा कठीण जाऊ शकते. अनेकदा असे दिसून येते की बरेच लोक वजन कमी करताना कॅलरीजचे सेवन कमी करतात, विशेषतः भात टाळतात. साहजिकच भात खाण्याची इच्छा असते पण तसे करायला भाग पाडले जाते.

भात खाऊनही तुमचे वजन कमी होऊ शकते. ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटेल, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तांदूळ शिजवताना त्यातील कॅलरीजचे (Calories) प्रमाण कमी करू शकता. ही खास गोष्ट तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात आरामात मिळवू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संशोधकही त्याला पाठिंबा देतात.

तांदूळ शरीरात ग्लायकोजेनमध्ये रूपांतरित होतो यावर तज्ज्ञांचे मत आहे. व्यायाम किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींनंतर कोणी भात खाल्ल्यास स्नायूंना ऊर्जा मिळते. असे न केल्यास, ग्लायकोजेन लवकरच ग्लुकोज बनते आणि चरबीच्या रूपात शरीरात साठले जाते.

तांदळात काय घालावे?

संशोधकांच्या मते, तांदूळातील (rice) कॅलरी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे उकळत्या पाण्यात एक चमचे खोबरेल तेल घालणे आणि नंतर त्यात भात सुमारे 25 मिनिटे शिजवणे. बनवल्यानंतर 12 तास फ्रीजमध्ये थंड करा. असे केल्याने तांदळाच्या कॅलरीज 60 टक्क्यांनी कमी करता येतात. हा सोपा मार्ग का नाही?

भात शिजल्यावर थंड करा

तांदूळ शिजल्यानंतर, जास्तीचे पाणी काढून टाका आणि किमान 12 तास रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. संशोधकांचे म्हणणे आहे की थंड करणे आवश्यक आहे कारण जिलेटिनायझेशन दरम्यान अमायलोज (स्टार्चचा विरघळणारा भाग) ग्रॅन्युल्स सोडतो.

स्टार्च वजन कसे कमी करू शकते

संशोधनानुसार, स्टार्च हा भाताचा घटक आहे आणि तो पचण्याजोगा किंवा अपचन दोन्ही असू शकतो. असे मानले जाते की जेव्हा पचलेला स्टार्च प्रतिरोधक स्टार्चमध्ये बदलतो तेव्हा वजन वाढणे टाळता येते. याचा अर्थ असे केल्याने कॅलरीज कमी होऊ शकतात. तसेच मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठीही ही रेसिपी प्रभावी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT