Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: नवीन वर्षात रिलेशनशिपला द्या नवसंजीवनी; प्रत्येक कपलने लक्षात ठेवावे 'हे' नियम

नव्या वर्षातील प्रत्येक दिवस आनंदी जाण्यासाठी नवरा-बायकोने पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या.

Puja Bonkile

Relationship Tips: नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुमच्या नात्यातील वाईट सवयी काढून टाका. नवीन वर्षात लोक काही संकल्प आणि वचने घेतात जेणेकरून त्यांचं नातं अधिक घट्ट होईल. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षात नातं घट्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

खोटं बोलणे टाळावं

एकमेकांशी कधीही खोटे बोलू नका. कारण खोटं नातं कमकुवत करते. तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तो खोटे बोलणार नाही. आम्ही स्पष्ट मनाने एकमेकांशी सर्वकाही शेअर करू.

क्वॉलिटि टाइम द्या

आठवड्यातून एक दिवस कॉफी डेट किंवा डिनरसाठी बाहेर जावे. यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवता येतो. अनेक गोष्टी शेअर देखील करता येतात.

आवडी-निवडीची काळजी घ्यावी

एकमेकांना समजून घ्या आणि जोडीदाराच्या निवडीची विशेष काळजी घ्यावी. नवीन वर्षात एकमेकांना वचन द्या की त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतील.

संवाद साधावा

रात्री झोपताना काही मिनिटे एकमेकांशी संवाद साधावा. तुमच्या दोघांची झोपण्याची वेळ सारखीच असावी. जास्त कामामुळे झोपण्याची वेळ सारखी नसेल तर उठण्याची वेळ सारखी ठेवावी.

वेळ द्यावा

जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत असता तेव्हा मोबाईलचा वापर कमी करावा. अनेक वेळा असे घडते की कपल्स एकमेकांना वेळ देण्यापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात.

फ्रेंड सर्कल

कपल्सचा फ्रेंड सर्कल असणे गरजेचे आहे. यामुळे ते वेळोवेळी त्यांच्या मित्रांसोबत बाहेर जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT