Relationship Tips: आपल्या सर्वांनाच आपली नाती खूप प्रिय असतात. आपल्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. मात्र अनेकदा खूप प्रयत्न करुनही एखाद्या नात्यात कटूता निर्माण होते. आपल्या जोडीदारासोबत जे आपले नाते असते त्यामध्ये आपल्यापैकी बरेचजण सारख्याप्रकारच्या चूका करत असतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या चूका आहेत ज्या आपण सगळेच करतो.
१. जिंकण्याची अपेक्षा
एखाद्या गोष्टीवर चर्चा होत असते, तेव्हा आपण आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी वाद घालायला लागतो, या वादात आपण जिंकण्याची अपेक्षा असल्याने वादाचे रुपांतर भांडणात होते. अशा परिस्थितीत अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीला दुखावतो. ही गोष्ट सातत्याने होत असल्यास जोडीदाराची तुमच्याबरोबर बोलण्याची , गोष्टी शेअर करण्याची इच्छा संपू शकते.
त्यामुळे कोणतीही चर्चा करत असताना समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, आपण बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा चर्चा करुन प्रश्न सोडवण्यावर भर देणे, समोरच्याचा दृष्टीकोण समजून घेणे आणि आपला दृष्टीकोण समजावून देणे महत्वाचे ठरते. थोडक्यात, नाते जपण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर उत्तम संवाद साधता आले पाहिजे.
२. चौकट आखलेली नसणे
आपण जेव्हा एखाद्या नात्यात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला काय हवे, काय नको हे स्वत:ला विचारत नाही. स्वत:लाच माहीत नसल्याने आपण समोरच्या व्यक्तीलादेखील सांगू शकत नाही. त्यामुळे कधी कधी आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही आनंदी नसल्याने नाते तुटण्याची शक्यता वाढते.
एखाद्या नात्यात प्रवेश करत असताना याबद्दल नेहमी स्पष्ट राहा कि तुम्हाला त्या नात्याकडून, तुमच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत. त्यासाठी तुम्ही स्वत: पाऊल उचलणे महत्वाचे ठरते.
३. आपल्या नात्याविषयी इतरांकडे तक्रारी
आपल्यापैकी अनेकजण जोडीदाराबरोबर भांडणे झाली, मतभेद झाले, जोडीदाराच्या कोणत्या गोष्टी आवडत नसल्या किंवा इतर काही अडचणी असतील तर त्याविषयी इतरांना सांगतात. मात्र त्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होत असतो.
जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असला, नात्यात अडचण वाटत असेल, गोष्टी योग्य वाटत नसेल तर त्याविषयी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बोला. इतरांकडून तुमच्या जोडीदाराला गोष्टी समजल्या तर नात्यात अविश्वास वाढण्याची शक्यता असते.
४. तुमच्या भावनांप्रति तुम्ही प्रामाणिक नसणे
अनेकदा जोडीदार आपल्याबद्दल काय विचार करेल या विचाराने आपल्याला नक्की काय वाटते हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपण समाधानी राहू शकत नाही. मात्र याचे वाईट परिणाम नात्यावर होऊ शकतात.
५. सोशल मिडियावर स्टॉकिंग करणे
आपल्या जोडीदाराला सोशल मिडियावर जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्टॉक करणे सुद्धा तुमच्या नात्यासाठी हानीकारण ठरु शकेत. कारण त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी सोशल मिडियावरुन समजल्या तर बोलण्यासाठी तुमच्याकडे काही उरत नाही.
याबरोबरच, कधी कधी सोशल मिडियावरुन आपण व्यक्ती कसा असेल असा विचार करत असतो. यातून असुरक्षितता, त्याच्या एक्स गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बद्दल जाणल्यानंतर त्यांच्याबरोबर तुलना करतो. त्यामुळे जास्त प्रमाणात सोशल मिडियावर स्टॉक करणे अयोग्य ठरु शकते.
याबरोबरच, नाते परिपूर्ण व्हावे अशी अपेक्षा, एका व्यक्तीमुळे इतर जवळच्या लोकांबरोबर संपर्क आणि संवाद कमी करणे, तुमच्या प्रत्येक अडचणीत किंवा प्रत्येक ठिकाणी तुमचा जोडीदार असावा अशी अपेक्षा करणे या गोष्टीसुद्धा नात्यासाठी अयोग्य असतात. त्यामुळे या चूका होणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.